दुसरी कसोटी : विजय, पुजाराचा लंकेला तडाखा; भारत २ बाद ३१२ धावा, पुजाराचे नाबाद शतक, विजयचे शतक

सलामीवीर मुरली विजयसह (१२८ धावा, २२१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), चेतेश्वर पुजाराने (नाबाद १२१ धावा, २८४ चेंडू, १३ चौकार) वैयक्तिक शतके झळकावताना दुस-या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने २ बाद ३१२ धावांची मजल मारली आणि श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुसºया कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:27 AM2017-11-26T03:27:28+5:302017-11-26T03:27:46+5:30

whatsapp join usJoin us
Second Test: Vijay, Pujara strike Lanka India scored 312 for two, Pujara's unbeaten century, a century to win | दुसरी कसोटी : विजय, पुजाराचा लंकेला तडाखा; भारत २ बाद ३१२ धावा, पुजाराचे नाबाद शतक, विजयचे शतक

दुसरी कसोटी : विजय, पुजाराचा लंकेला तडाखा; भारत २ बाद ३१२ धावा, पुजाराचे नाबाद शतक, विजयचे शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : सलामीवीर मुरली विजयसह (१२८ धावा, २२१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), चेतेश्वर पुजाराने (नाबाद १२१ धावा, २८४ चेंडू, १३ चौकार) वैयक्तिक शतके झळकावताना दुस-या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने २ बाद ३१२ धावांची मजल मारली आणि श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुसºया कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली. विजय बाद झाल्यानंतर पुजाराने अर्धशतकी खेळी करणाºया कर्णधार कोहलीसह (नाबाद ५४ धावा, ७० चेंडू, ६ चौकार) तिसºया विकेटसाठी ९६ धावांची अभेद्य भागीदारी केली आणि भारताला विशाल धावसंख्येचा पाया रचून दिला. २००८ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाची कसोटी याच मैदानावर खेळणाºया मुरली विजयने आठ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट खेळताना श्रीलंकेविरुद्ध प्रथमच शतकाची वेस ओलांडली. त्याने कारकिर्दीतील दहावे शतक झळकाविले आणि दक्षिण आफ्रिका दौºयासाठी सलामीवीर म्हणून दावा अधिक मजबूत केला. फॉर्मात असलेले शिखर धवन व के.एल. राहुल यांच्यापाठोपाठ विजयनेही छाप सोडल्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी सलामीवीरांची निवड करताना सुसह्य डोकदुखी निर्माण झाली आहे. श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळणाºया भारताने दुसºया दिवसअखेर पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी झळकावलेली शतके दुसºया दिवसाच्या खेळाचे ठळक वैशिष्ट्य ठरली. अद्याप ८ विकेट शिल्लक असल्यामुळे भारत तिसºया दिवशी पहिल्या डावात किती धावांची आघाडी घेणार याची उत्सुकता आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी १२१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या पुजाराला कर्णधार कोहली (५४) साथ देत होता. पहिल्या दिवशी याच खेळपट्टीवर संघर्ष करणाºया श्रीलंकेच्या फलंदाजांना आज दुसºया दिवशी पुजारा, विजय व कोहली यांनी येथे कशी फलंदाजी करायची, याचा धडाच दिला.
कालच्या १ बाद ११ धावसंख्येवरून पुढे खेळताना विजय व पुजारा यांनी आज सुरुवातीला सावध फलंदाजी केली. वैयक्तिक १९ धावांवर असताना रंगना हेराथच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरलेला विजयाने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत अर्धशतकाची वेस ओलांडली आणि त्यानंतर वैयक्तिक ६१ धावांवर असताना गमागेच्या गोलंदाजीवर मिळालेल्या जीवदानानंतर शतकाला गवसणी घातली.
पहिल्या सत्रात ८६ धावांची भर घालणाºया भारताने दुसºया सत्रात ८८ धावा फटकावल्या. भारताने तिसºया दिवशी ३०१ धावांची भर घातली. चहापानानंतर धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात असताना मुरली विजय हेराथच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विजयचा उडालेला झेल परेराने टिपला. त्याआधी, विजयने पुजारासह दुसºया विकेसाठी २०९ धावांची भागीदारी करीत भारताला आघाडी मिळवून दिली होती. या मैदानावरील दुसºया विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी ठरली. शुक्रवारी राहुलला तंबूचा मार्ग दाखविणाºया श्रीलंकेला दुसरा बळी घेण्यासाठी ७१.२ षटके प्रतीक्षा करावी लागली. विजय माघारी परतल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार कोहलीने पुजाराच्या साथीने धावगतीला वेग दिला. खाते उघडण्यापूर्वीच कोहलीविरुद्ध पायचितचे जोरदार अपील झाले होते, पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावले. श्रीलंकेने रिव्ह्यू घेतला खरा, पण चेंडू बॅटला चाटून बॅटवर आदळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पुजाराने कारकिर्दीतील १४ वे व श्रीलंकेविरुद्धचे चौथे शतक पूर्ण केले. पुजाराने आजच्या नाबाद खेळीत २०१७ मध्ये एक हजार धावा फटकावण्याची कामगिरी केली.

धावफलक
श्रीलंका पहिला डाव २०५.
भारत पहिला डाव :- के.एल. राहुल त्रि.गो. गमागे ०७, मुरली विजय झे. परेरा गो. हेराथ १२८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १२१, विराट कोहली खेळत आहे ५४. अवांतर (२). एकूण ९८ षटकांत २ बाद ३१२. बाद क्रम : १-७, २-२१६, गोलंदाजी : सुरंगा लकमल १८-२-५८-०, लाहिरू गमागे २२-७-४७-१, रंगना हेराथ २४-८-४५-१, दासुन शनाका १३-३-४३-०, दिलरुवान परेरा २१-०-११७-०.

Web Title: Second Test: Vijay, Pujara strike Lanka India scored 312 for two, Pujara's unbeaten century, a century to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.