पराभूत सामन्यातही विराटची कमाल, बनला अशी कामगिरी करणारा गावसकरांनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज

सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देणारा ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:03 PM2018-01-18T19:03:22+5:302018-01-18T19:07:10+5:30

whatsapp join usJoin us
The second Indian batsman after Gavaskar, who has been the greatest batsman in the losing side, has done a great job | पराभूत सामन्यातही विराटची कमाल, बनला अशी कामगिरी करणारा गावसकरांनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज

पराभूत सामन्यातही विराटची कमाल, बनला अशी कामगिरी करणारा गावसकरांनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई -  सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देणारा ठरला. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात केलेल्या 153 धावांच्या खेळीच्या जोरावर विराटने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवताताना आपली गुणसंख्या 900 वर पोहोचवली आहे. 

आज जाहीर झालेल्या आयसीसीच्या सुधारित क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दीडशतकी खेळीचा फायदा विराट कोहलीला झाला. या खेळीच्या जोरावर विराटने आपली गुणसंख्या 900 वर पोहोचवली आहे. त्याबरोबरच आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 900 हून अधिक गुणांची कमाई करणारा विराट हा सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गावसकर यांनी 1979 साली ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध 221 धावांची खेळी करताना 916 धावांचा टप्पा ओलांडला होता. तसेच विराट हा कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 900 गुणांचा टप्पा ओलांडणारा  जागतिक क्रिकेटमधील 31 वा फलंदाज ठरला आहे. 

सुनील गावसकर आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांना कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 900 गुणांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविड 900 गुणांचा टप्पा ओलांडण्याचा जवळ पोहोचले होते, पण त्यांनाही 900 गुणांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. सचिन तेंडुलकरने 2002 साली कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 898 गुणांपर्यंत मजल मारली होती. तर राहुल द्रविडने 2005 साली 892 गुणांची कमाई केली होती. दरम्यान, कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांनी 961 गुणांची कमाई केली होती. तर सध्याच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ 947 गुणांसह अव्वलस्थानी आहे. 

 दरम्यान, आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या 'क्रिकेटर ऑफ द इयर'  तसेच वनडेमधल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराटची आजच निवड झाली आहे. आयसीसीच्या कसोटी आणि वनडे संघाच्या कर्णधारपदीही विराटची निवड करण्यात आली आहे. भारताची रनमशीन असलेल्या विराटने वनडेमध्ये 26 डावात 76.84 च्या सरासरीने 1460 धावा केल्या आहेत. यात सहा शतकांचा समावेश आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती तसेच इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्या. 

बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विजय मिळवला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत कोहली दुस-या स्थानावर आहे. मागच्या वर्षीच त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या वर्षभरात वनडेमध्ये चांगले यश मिळवले आहे. कोहली आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये 889 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे. 

Web Title: The second Indian batsman after Gavaskar, who has been the greatest batsman in the losing side, has done a great job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.