...हा क्रिकेटर माझा ऑल टाइम फेव्हरेट, सौरव गांगुलीने केला खुलासा 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या आवडत्या खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा एकेकाळचा साथीदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 03:27 PM2017-12-22T15:27:14+5:302017-12-22T15:33:58+5:30

whatsapp join usJoin us
Saurav Ganguly disclosed his all time favorite cricketer | ...हा क्रिकेटर माझा ऑल टाइम फेव्हरेट, सौरव गांगुलीने केला खुलासा 

...हा क्रिकेटर माझा ऑल टाइम फेव्हरेट, सौरव गांगुलीने केला खुलासा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आपला आवडता खेळाडू असल्याचा खुलासा केला आहेसचिन आणि सौरव गांगुलीच्या जोडीने 136 सामन्यांमध्ये ओपनिंग केली होतीदोघांनी मिळून 21 शतकी आणि 23 अर्धशतकीय पार्टनरशिपच्या मदतीने 6609 धावा केल्या

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या आवडत्या खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा एकेकाळचा साथीदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. आपल्या करिअरमध्ये सौरव गांगुलीने अनेकदा आपण सचिन तेंडुलकरच्या विशिष्ट शैली आणि फलंदाजी कौशल्याचे चाहते असून, नकल करण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली होती. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने हा खुलासा केला आहे. 41 वर्षीय सौरव गांगुलीने यावेळी तरुणपणी इंग्लंडचे क्रिकेटर डेव्हिड आपल्याला प्रचंड आवडायचे हेदेखील सांगितलं. सचिन आणि सौरव गांगुलीच्या जोडीने 136 सामन्यांमध्ये ओपनिंग केली होती. यावेळी दोघांनी मिळून 21 शतकी आणि 23 अर्धशतकीय पार्टनरशिपच्या मदतीने 6609 धावा केल्या होत्या. दोघांच्या शतकीय ओपनिंग पार्टरनरशिप आजही एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 

सौरव गांगुलीच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले होते. सौरव गांगुली भारतासाठी एकूण 400 सामने खेळला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सौरव गांगुलीने आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं होतं. आपल्या कर्णधारपद सोपवल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले होते. पण कुशल नेतृत्वाने आपण भारतीय क्रिकेट संघाचा चेहरा बदलला असं सौरव गांगुलीने सांगितलं. सौरव गांगुलीने भारतीय संघात परदेशात जाऊन जिंकण्याची भावना निर्माण केली होती. 

311 एकदिवसीय सामने खेळणा-या सौरव गांगुलीने 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 शतक आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. सौरव गांगुलीची सर्वाधिक धावसंख्या 183 आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सौरव गांगुलीने 190 षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे 113 कसोटी सामन्यांमध्ये सौरव गांगुलीच्या नावे 7212 आहे. ज्यामध्ये सर्वाधिक 239 धावसंख्या आहे. कसोटी सामन्यात सौरव गांगुलीने 16 शतक आणि 35 अर्धशतकं लगावली आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 21 सामने जिंकले आहेत. 

दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावे 49 शतक आणि 96 अर्धशतकं आहेत. दुसरीकडे 200 कसोटी सामन्यांमध्ये सचिनने 15921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतक आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 तही सचिन तेंडुलकरने आपला जलवा दाखवला होता. 96 टी-20 सामन्यात सचिनने 2797 धावा केल्या. यासोबत एक शतकही लगावलं होतं.

Web Title: Saurav Ganguly disclosed his all time favorite cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.