आपला तो बाब्या... सर्फराझने पाकिस्तानी सैन्याचा युनिफॉर्म घातला, PCBला नाही दिसला!

भारतीय क्रिकेट संघाच्या आर्मी कॅप घालून खेळण्याच्या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( पीसीबी) जळफळाट झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:14 PM2019-03-25T13:14:39+5:302019-03-25T13:15:10+5:30

whatsapp join usJoin us
Sarfraz Ahmed puts on Pakistan military uniform in Quetta celebration | आपला तो बाब्या... सर्फराझने पाकिस्तानी सैन्याचा युनिफॉर्म घातला, PCBला नाही दिसला!

आपला तो बाब्या... सर्फराझने पाकिस्तानी सैन्याचा युनिफॉर्म घातला, PCBला नाही दिसला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : भारतीय क्रिकेट संघाच्या आर्मी कॅप घालून खेळण्याच्या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( पीसीबी) जळफळाट झाला होता. त्यावेळी क्रिकेट आणि राजकारण हे एकत्र आणू नका असा सूर आवळत पीसीबी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) शहाणपणाचे डोस देऊ पाहत होता. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) त्यांना तोंडावर पाडताना बीसीसीआयनं रितसर परवानगी घेतल्याचे सांगितले. सोमवारी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद आर्मीच्या यनिफॉर्मात दिसला, त्यावेळी पीसीबी झोपले होते का, असा सवाल नेटिझन्स करत आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना श्रंद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने रांची येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात आर्मीची कॅप घातली होती. भारतीय संघाच्या या भूमिकेवर पीसीबीनं थेट आयसीसीकडे भारतीय संघाची तक्रार केली होती. भारतीय संघ क्रिकेट आणि राजकारण याची सरमिसळ करत असल्याचा आरोप पीसीबीनं केला होत, परंतु आयसीसीनं त्यांची तक्रार फेटाळली. 

पण, याच पीसीबीच्या संघाचा कर्णधार सर्फराज अहमद पाकिस्तान सुपर लीगच्या ( पीएसएल) जेतेपदानंतर आर्मीच्या युनिफॉर्मात दिसला. क्युएट्टा ग्लॅडिएटर संघाने पीएसएलचे जेतेपद पटकावले आणि त्यांनी पेशावर झल्मीचा पराभव केला.  या विजयानंतर ग्लॅडिएटर संघाची घरच्या शहरात मिरवणुक काढण्यात आली. संघासाठी आयोजित सोहळ्यात सर्फराज आर्मीच्या युनिफॉर्मात दिसला. 





आयपीएल बंदीमुळे पाक चाहत्यांची गोची, मॅच पाहण्यासाठी खटाटोप

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात भारतात पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या देशात इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी ही माहिती दिली, परंतु पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पाकमधील क्रिकेट चाहत्यांची गोची झाली आहे आणि आयपीएलचे सामने पाहण्यासाठी ते विविध पर्याय शोधत आहेत.  2008नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तरीही पाकिस्तानमध्ये आयपीएलचे अधिक चाहते आहेत आणि त्यांना आयपीएलचे सामने पाहायला आवडतात. 

Web Title: Sarfraz Ahmed puts on Pakistan military uniform in Quetta celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.