लठ्ठपणामुळे विराटनं केलं होतं टीमबाहेर, आता फिट होऊन परतला संघात 

लठ्ठपणामुळं संघातून बाहरेचा रस्ता दाखवला होता...आता तो पुन्हा परतलाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 04:47 PM2018-01-09T16:47:10+5:302018-01-09T16:54:34+5:30

whatsapp join usJoin us
sarfaraz khan gets unexpected ipl lifeline as royal challengers bangalore retain him | लठ्ठपणामुळे विराटनं केलं होतं टीमबाहेर, आता फिट होऊन परतला संघात 

लठ्ठपणामुळे विराटनं केलं होतं टीमबाहेर, आता फिट होऊन परतला संघात 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळे किती प्रसिद्ध आहे. हे काही वेगळं सांगायला नको. तो स्वत: बरोबरच संघातील इतर खेळाडूंनाही फिटनेसचे महत्व समजावत असतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरुच्या संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीनं सर्फराज खानला त्याच्या लठ्ठपणामुळं संघातून वगळलं होतं. तू आधी वजन कमी कर मग तुला संघात जागा दिली जाईल असे सुनावलं होतं. त्यावेळीच सर्फराजला त्यानं फिटनेसचे महत्व समजावून सांगितले होते. 

विराट कोहलीनं दिलेल्या सल्यानुसार सर्फराजनं  आपल्या फिटनेसवर आधिक लक्ष दिलं. त्यानं जिममध्ये वर्कआऊट करत आपलं वजन घटवलं. त्याला आता ओळखताही येत नाही. म्हणजे आधीचा सर्फराज हा थोडासा लठ्ठ दिसत होता.  त्याची ही मेहनत पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगळरुनं विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स या प्रमुख खेळाडूंसह युवा सर्फराज खानला आपल्याकडे कायम राखले आहे. क्रिडाप्रेमीसाठी हा धक्कादायक निर्णय होता. पण त्याची मेहनत आणि आणि खेळण्याची जिद्द त्यामुळं त्याची निवड झाली. आरसीबीनं त्याला तीन करोडमध्ये खरेदी केलं आहे. 

संघात निवड झाल्यानंतर सर्फराज खान आनंदी होता. यावेळी त्यानं कर्णधार विराट कोहलीला धन्यवाद म्हटलं. तो म्हणतो, विराट कोहलीनं केलेलं मार्गदर्शन माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. माझ्यासारख्या अन्य युवा खेळाडूनं त्याच्याकडून शिकायला हवं. खेळाबरोबरच फिटनेस किती महत्वाचे असते हे  प्रत्येक खेळाडूनं विराटकडून शिकायला हवं.

फिटनेससाठी असा आहे कोहलीचा डाएट प्लान
जगातील सगळ्यात फिट क्रिकटर्समध्ये विराटचं नाव मोजलं जातं. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो. वेब सिरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन'मध्ये विराट कोहलीने त्याच्या फिटनेस आणि डाएट प्लानबद्दल सांगितलं आहे. फिट राहण्याचा विराटचा मंत्रा त्याने या सिरीजच्या माध्यमातून सांगितला आहे. जिममध्ये हार्ड ट्रेनिंगबरोबरच विराट दररोज योग्य डाएट फॉलो करतो. दिवसाच्या सुरूवातीला योग्य नाश्ता केला तर आरोग्यासाठी चांगलं असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. तोच रूल विराटही फॉलो करतो.

विराटच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश जास्त आहे. तीन अंड्यांचं ऑमलेट (व्हाइट एग), एक अख्खं अंड विराटच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये असतं. तसंच त्याबरोबर पालकाचा पदार्थ, चीजही नाश्त्यात असतं. पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगड ही फळ खाऊन विराट एक कप ग्रीन टी घेतो. सकाळी हेव्ही ब्रेकफास्ट करावा. हेच विराटकडून पाळलं जातं.  त्यानंतर प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर विराट आपल्या दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन, कुस्करलेले बटाटे, पालकाचा एखादा पदार्थ आणि इतर भाज्या खातो. रात्रीचं जेवण एकदम हलकं असायला हवं, असा सल्ला नेहमीचं डॉक्टरांकडून दिला जातो. विराट त्याच्या रात्रीच्या जेवणात विराट सी-फूड खातो.

बटर चिकन ही विराट कोहलीची सर्वात आवडती डीश आहे, असं नेहमीच त्याचा प्रत्येक फॅनकडून बोललं जातं. पण विराटने गेल्या 4 वर्षांमध्ये विराटने बटर चिकनला हातही लावलेला नाही. आपल्या फिटनेसकडे लक्ष देत विराट हेल्थी लाईफस्टाईलचे सगळे रूल फॉलो करताना दिसतो आहे.  

Web Title: sarfaraz khan gets unexpected ipl lifeline as royal challengers bangalore retain him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.