मान्यता दत्तने धोनीसोबतचा फोटो शेअर केला, कॅप्शनमुळे ट्रोल झाला

आशियाई स्पर्धेत टीम इंडियाचा परफॉर्मन्स दमदार दिसून येत आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमुळेही या स्पर्धेकडे चाहत्यांचा कल वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 09:54 AM2018-09-26T09:54:54+5:302018-09-26T09:55:50+5:30

whatsapp join usJoin us
sanjay dutt wife maanayata meet ms dhoni see fans reaction on photo | मान्यता दत्तने धोनीसोबतचा फोटो शेअर केला, कॅप्शनमुळे ट्रोल झाला

मान्यता दत्तने धोनीसोबतचा फोटो शेअर केला, कॅप्शनमुळे ट्रोल झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई - महेंद्रसिंह धोनीचे जगभरात चाहते आहेत, त्यामध्ये बॉलिवूड स्टार्संचाही समावेश आहे. सलमानपासून ते रजनीकांतपर्यंत दिग्गज कलाकार धोनीचे चाहते आहेत. तर कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीही आपल्या चाहत्यांचा तेवढाच आदर करतो. त्यामुळेच धोनीचे चाहते धोनीला भेटायला दुबईतही पोहोचतात. नुकतेच बॉलिवूडचा संजुबाबा म्हणजे संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने धोनीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

आशियाई स्पर्धेत टीम इंडियाचा परफॉर्मन्स दमदार दिसून येत आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमुळेही या स्पर्धेकडे चाहत्यांचा कल वाढला आहे. त्यातच, मंगळवारचा सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळण्यात आला. टीम इंडियाच कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना होता. या सामन्यापूर्वीच अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने दुबईत जाऊन धोनीची भेट घेतली. मान्यताने धोनीसोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मान्यताने हा फोटो शेअर करताना 'MSD & MSD' असे कॅप्शन दिले आहे. म्हणजे, इंग्रजीत मान्यता आपले नाव Maanayata Sanjay dutt, असेच लिहते. त्यामुळे हे कॅप्शन टाकून मान्यताने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच धोनी हा सर्वाच चांगला क्रिकेटर तर आहेच, पण सर्वात चांगला माणूसही आहे. मान्यताचा हा फोटो अनेकांनी आवडला आहे. तर काहींनी मान्यताने दिलेल्या कॅप्शनवरुन तिची खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न केला आहे. 

Web Title: sanjay dutt wife maanayata meet ms dhoni see fans reaction on photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.