अखेर सागरिका घाटगेने काढली झहीर खानची विकेट! 27 नोव्हेंबरला ताज हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आज अखेर विवाहबंधनात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 02:04 PM2017-11-23T14:04:26+5:302017-11-24T03:33:04+5:30

whatsapp join usJoin us
Sagarika Ghatge finally got Zaheer Khan's wicket! Grand reception at Taj Hotel on 27th November | अखेर सागरिका घाटगेने काढली झहीर खानची विकेट! 27 नोव्हेंबरला ताज हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

अखेर सागरिका घाटगेने काढली झहीर खानची विकेट! 27 नोव्हेंबरला ताज हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान गुरुवारी अभिनेत्री ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका घाटगे हिच्याशी मुंबईत विवाहबद्ध झाला. त्याच वेळी, दुसरीकडे मेरठ येथे भारताचा सध्याचा आघाडीचा वेगवान गोलंदाज ‘स्विंगचा बादशाह’ भुवनेश्वर कुमारही आपली बालमैत्रीण नूपुर नागल हिच्याशी विवाहबद्ध झाला.
झहीर आणि सागरिका यांनी मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी न्यायालयामध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला. या वेळी दोघांच्या कुटुंबीयांसमवेत अनेक जवळचे मित्र उपस्थित होते. २७ नोव्हेंबरला झहीर-सागरिका यांच्या विवाहाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतसमारंभ होणार असून, या सोहळ्यासाठी क्रिकेट आणि बॉलिवूडसह अनेक क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती उपस्थित राहतील.
सागरिकाची जवळची मैत्रीण आणि चक दे इंडिया चित्रपटात तिच्यासह काम केलेल्या विद्या मालवडेने दोघांच्याही लग्नाचे छायाचित्र ट्विटरवर अपलोड केले. झहीर आणि सागरिका यांनी यंदा एप्रिल महिन्यात साखरपुडा उरकला होता. सागरिकाने अनेक मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. महान अष्टपैलू वेगवान गोलंदाज कपिलदेव आणि श्रीनाथ यांच्यानंतर भारताकडून वेगवान गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखलेल्या झहीरने आॅक्टोबर २०१५ साली क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने ९२ कसोटी सामन्यांत ३११ आणि २०० एकदिवसीय सामन्यात २८२ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
>दिमाखदार सोहळा...
दुसरीकडे मेरठ येथे भारताचा सध्याचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही बालमैत्रीण नूपुर नागलसह विवाहबद्ध झाला. २० नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे कसोटी सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर भुवनेश्वरने लग्नाच्या निमित्ताने दुसºया कसोटी सामन्यातून माघार घेतली. २२ नोव्हेंबरला हळद, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला दोघांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा पार पडला. नुपूर व्यवसायाने इंजिनियर असून ग्रेटर नोएडा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग आणि नूपुरचे वडील यशपाल सिंग दोघेही निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत.

Web Title: Sagarika Ghatge finally got Zaheer Khan's wicket! Grand reception at Taj Hotel on 27th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.