सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम

आजच्या दिवशी घडलेला हा विश्वविक्रम मात्र अजूनही आबाधित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 05:28 PM2019-06-29T17:28:16+5:302019-06-29T17:31:04+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar's done one world record in this day | सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम

सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर अजूनही काही विक्रम कायम आहेत. या काही विश्वविक्रमांपैकी एक अभेद्य विश्वविक्रम आजच्याच दिवशी 2007 साली झाला होता. या गोष्टीची आठवण काही दर्दी चाहत्यांना असेल, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या गोष्टीची आठवण क्रिकेट चाहत्यांना करून दिली आहे.

Image result for sachin tendulkar

सचिनच्या नावावरील काही विश्वविक्रम मोडीत निघाले आहेत. पण आजच्या दिवशी घडलेला हा विश्वविक्रम मात्र अजूनही आबाधित आहे. आजच्या दिवशी 2007 साली सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंधरा हजार धावांचा मैलाचा दगड गाठला होता. सचिनचा हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे.

Related image
Related image


विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागे
भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.

Image result for sachin tendulkar

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत. 

तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा होत्या. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. पण आता कोहली या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण २० हजार आंतरराष्ट्रीय धावा ४१६ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत.

Web Title: Sachin Tendulkar's done one world record in this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.