मुंबईच्या पाच वर्षीय अनैशा नाहरचे उपविजेतेपद

मुंबईची उदयोन्मुख बुध्दिबळपटू अनैशा नाहर हिने पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत खेळताना जबरदस्त प्रदर्शन करत ७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद पटकावले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:12 AM2017-08-18T05:12:15+5:302017-08-18T05:12:18+5:30

whatsapp join usJoin us
The runner-up of Mumbai's five-year-old Anisha Nahar | मुंबईच्या पाच वर्षीय अनैशा नाहरचे उपविजेतेपद

मुंबईच्या पाच वर्षीय अनैशा नाहरचे उपविजेतेपद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : मुंबईची उदयोन्मुख बुध्दिबळपटू अनैशा नाहर हिने पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत खेळताना जबरदस्त प्रदर्शन करत ७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद पटकावले. निर्णायक सामन्यात सोलापूरच्या स्वराली हातवळणेकडून झालेल्या पराभवामुळे अनैशाचे जेतेपद थोडक्यात हुकले.
धारावी क्रीडा संकुलामध्ये मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत पाचवर्षीय अनैशाने पहिल्यांदाच राज्य निवड स्पर्धेत खेळताना आपली छाप पाडली. तीने पहिल्या लढतीपासून आपली दखल घेण्यास भाग पाडताना सलग ५ लढती जिंकत विजेतेपदाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली होती. गोरेगावच्या विबग्योर स्कूलची विद्यार्थीनी असलेल्या अनैशाने अप्रतिम चाली आणि आक्रमक रणनितींचा अवलंब करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडले.
सुरुवातीचे पाच सामने जिंकून जबरदस्त वर्चस्व राखलेल्या अनैशाला सहाव्या सामन्यात कसलेल्या स्वरालीविरुद्ध पराभूत व्हावे लागले. अनैशाने स्वरालीविरुद्ध चांगल्या चाली रचून रंगत निर्माण केली होती. परंतु, अनुभवी स्वरालीने कोणतेही दडपण न घेता अनैशाच्या प्रत्येक चालीला भक्कम बचावाच्या जोरावर प्रत्युत्तर देत बाजी मारली. स्वरालीने सर्वाधिक ७.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. अनैशाला ७ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुंबईच्याच त्रिशा जगतापने ६.५ गुणांसह तृतीय स्थान मिळवले.
दक्षिण मुंबई बुध्दिबळ अकादमीमध्ये सराव करीत असलेली अनैशा पुढील महिन्यात विजयवाडा येथे होणाºया राष्ट्रीय अजिंक्यपद बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.

Web Title: The runner-up of Mumbai's five-year-old Anisha Nahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.