रोहितचा डबलबार! भारताचा लंकेवर पलटवार

कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 07:25 PM2017-12-13T19:25:54+5:302017-12-13T21:00:25+5:30

whatsapp join usJoin us
Rohit double! Counter-terrorism in India | रोहितचा डबलबार! भारताचा लंकेवर पलटवार

रोहितचा डबलबार! भारताचा लंकेवर पलटवार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली - कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला. रोहित शर्माने फटकावलेले झंझावाती द्विशतक, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांची अर्धशतकांच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने पाहुण्या श्रीलंकेवर 141 धावांनी मोठा विजय मिळवत तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या  मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्या जबरदस्त खेळी करणाऱ्या रोहित शर्माने सामनावीराचा मान पटकावला.
भारताने विजयासाठी दिलेले आव्हान श्रीलंकेला पेलवले नाही. सुरुवातीपासूनच त्यांच्या डावाला गळती लागली. अॅजेलो मॅथ्युजचा अपवाद वगळता लंकेच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. अँजेलो मॅथ्युजने एक बाजू लावून धरत नाबाद 112 धावांची खेळी केली. अखेर लंकेला 50 षटकात 8 बाद  251 धावांपर्यंतच मजल मारता आली. 
तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने 392 धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणा-या रोहितने कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. 153 चेंडूंमध्ये केलेल्या 208 धावांच्या धमाकेदार खेळीदरम्यान त्याने शिखर धवनसोबत 115 धावांची तर श्रेयस अय्यरसोबत 213 धावांची भागीदारी केली. 
पहिल्या वनडेमध्ये भारताला भारी पडलेल्या लकमल, प्रदीपच्या गोलंदाजीचा रोहित शर्माने अक्षरक्ष पालापाचोळा केला. फर्नाडोच्या 10 षटकात भारताने 106 धावा वसूल केल्या तर लकमलच्या 8 षटकात 71 धावा चोपून काढल्या. रोहितने आपल्या खेळीदरम्यान 13 चौकार 12 षटकारांची आतिषबाजी केली. रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा 115 चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केल्या. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने लंकेविरोधात 392 धावांचा डोंगर उभारला.  
 रोहित शर्माबरोबरच श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनीही दमदार खेळ केला.  श्रेयस अय्यरने (88) धावा तडकावल्या. त्यापूर्वी सलामीवीर शिखर धवननेही अर्धशतकी खेळी केली. शिखरने 67 चेंडूत (68) धावा तडकावताना 9 चौकार ठोकले 
 

Web Title: Rohit double! Counter-terrorism in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.