रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी

तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामना पाहिला तर भारतीय संघामध्ये तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 07:45 PM2019-02-11T19:45:00+5:302019-02-11T19:45:46+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant is headache for indian cricket selection committee | रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी

रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामना पाहिला तर भारतीय संघामध्ये तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांचा समावेश होता. पण आता रिषभ पंत डोकेदुखी ठरू लागला आहे, असे मत दस्तुरखुद्द निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे.

प्रसाद हे निवड समितीचे अध्यक्ष असले तरी ते भारताकडून यष्टीरक्षक म्हणूनच खेळले होते. त्यामुळे एका संघात तीन यष्टीरक्षक असणे, ही बाब कदाचित त्यांना योग्य वाटत नसावी. आगामी विश्वचषकाचा विचार केल्यास एका संघात तीन यष्टीरक्षक असणे किती योग्य आहे, याचा विचारही प्रसाद करत असतील.

तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यानंतर प्रसाद म्हणाले की, " रिषभ पंतता फॉर्म हा आमच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण रिषभ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे त्याची संघातील स्थान कायम आहे. पण आम्ही जेव्हा एखादा संघ निवड करण्यासाठी बैठक घेतो, तेव्हा संघातील 15 खेळाडू निवडणे हे आमच्यासाठी कठिण होऊन बसते. खरेतर संघासाठी ही फार चांगली गोष्ट आहे. कारण संघांमध्ये चांगली स्पर्धा आहे आणि या गोष्टीचा संघाला फायदाच होत आहे." 

यष्टीरक्षक म्हणून धोनीलाच पहिली पसंती
मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आमची महेंद्रसिंग धोनीलाच पहिली पसंती आहे. कारण आतापर्यंत एक यष्टीरक्षक म्हणून त्याची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. त्यामुळे आम्ही आगामी विश्वचषकाचा विचार करत असताना संघातील यष्टीरक्षक या पदासाठी धोनीलाच पहिली पसंती देत आहोत, असेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

धोनीने केली वाऱ्याच्या वेगासारखी स्टम्पिंग
तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी जोरदार फटकेबाजी करताना रोहितचा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 7.4 षटकांत 80 धावांची सलामी दिली आणि त्यांची ही भागीदारी फिरकीपटु कुलदीप यादवने संपुष्टात आणली. पण, त्याला विकेट मिळवून देण्यात धोनीचा मोलाचा वाटा होता. धोनीने सेकंदाच्या 0.099 इतक्या जलद वेगाने ही स्टम्पिंग करून किवींना पहिला धक्का दिला.

Web Title: Rishabh Pant is headache for indian cricket selection committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.