फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा संपुष्टात?

भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:54 PM2019-02-15T18:54:24+5:302019-02-15T18:55:42+5:30

whatsapp join usJoin us
Ravindra Jadeja's hope of playing World Cup ends? | फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा संपुष्टात?

फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा संपुष्टात?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ पाच वन डे सामने खेळणार आहे आणि याच पाच सामन्यांतून भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंतिम संघ निवडला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. पण, यात जडेजाचे नाव नसल्याने वर्ल्ड कप संघात त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांसाठीच्या या मालिकेत वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठीच्या संघात कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे, तर त्याच्या जागी भटिंडाच्या मयांक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे. वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने थोडे फेरबदल असलेले दोन संघ जाहीर केले. पहिल्या दोन वन डे सामन्यासाठीच्या संघात भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी संघात तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौलला संधी मिळाली आहे.



मात्र, उर्वरित तीन वन डे सामन्यांत तो कमबॅक करणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय शंकरला ट्वेंटी-20 व वन डे अशा दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे अष्टपैलू म्हणून तो हार्दिक पांड्याला सोबत राहिल. फिरकीसाठी युजवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी पहिली पसंती होती आणि त्यानुसार त्यांना संधी मिळालीही. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अधिकाधिक संधी मिळावी म्हणून रिषभ पंतलाही दोन्ही मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. 




या सगळ्या संघात जडेजाचं नाव नसल्याने थोडं आश्चर्य वाटले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन डे  मालिकेत व दोन कसोटी सामन्यांत त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ दोन विकेट घेतल्या, तर 8 धावा केल्या. कसोटीत मात्र त्याने दोन सामन्यांत 7 विकेट घेतल्या होत्या. 
 

Web Title: Ravindra Jadeja's hope of playing World Cup ends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.