रवींद्र जडेजा रुग्णालयात, पहिल्या कसोटीआधी भारताला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 1:28am

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौºयात पहिली कसोटी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

केपटाऊन -  भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौºयात पहिली कसोटी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरलमुळे गेल्या दोन दिवसांपासून रवींद्र जडेजाला त्रास जाणवत होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला भरती करण्यात आले. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचे वैद्यकीय पथक जडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. पुढील ४८ तासांत जडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला. पहिल्या कसोटीसाठी जडेजाचा संघात समावेश करायचा की नाही, याचा निर्णय अखेरच्या दिवशी घेण्यात येईल. याआधी सलामीवीर शिखर धवन याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती, तथापि तो फिट असल्याचे संघव्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तो मुरली विजयसोबत डावाला सुरुवात करेल. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागल्यास शिखर धवनच्या जागी लोकेश राहुलला भारतीय संघात सलामीच्या जागेवर खेळविण्याची तयारी करण्यात आली होती. भारताने तीन वगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह खेळण्याचा निर्णय घेतल्यास रविचंद्रन आश्विन याला जडेजाऐवजी संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)

संबंधित

Asia Cup 2018: आशिया चषकाच्या अंतिम फेरीत असा असू शकेल अंतिम भारतीय संघ
Asia Cup 2018, India vs Afghanistan : ... असं फक्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीच करू शकतो
IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली
Asia Cup 2018 : रवींद्र जडेजा का बदलतोय सतत हेअर स्टाईल, ऐका त्याच्याच तोंडून 
Asia Cup 2018: तब्बल चार वर्षांनंतर रवींद्र जडेजाने केला हा पराक्रम

क्रिकेट कडून आणखी

असरार संघावर मात करीत कुरैशी संघ अजिंक्य
IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी गब्बर घेतोय खास मेहनत, पाहा हा व्हिडीओ
आयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ होणार फिट
आयसीसी क्रमवारी : भारतासह कोहलीही ठरला अव्वल
यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही, न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना आला अनुभव

आणखी वाचा