संघातून बाहेर झाल्यामुळे संतापला रविंद्र जडेजा? वादग्रस्त फोटोमुळे चाहते संभ्रमात

रविंद्र जडेजाने फोटोबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही पण चाहत्यांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.

By सागर सिरसाट | Published: September 26, 2017 11:58 AM2017-09-26T11:58:02+5:302017-09-26T12:00:48+5:30

whatsapp join usJoin us
Ravindra Jadeja due to being out of the team? Shared photo, controversy of fans | संघातून बाहेर झाल्यामुळे संतापला रविंद्र जडेजा? वादग्रस्त फोटोमुळे चाहते संभ्रमात

संघातून बाहेर झाल्यामुळे संतापला रविंद्र जडेजा? वादग्रस्त फोटोमुळे चाहते संभ्रमात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत संधी न मिळालेला स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात संधी न मिळाल्याने जडेजाने ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला होता. पण थोड्याच वेळात त्याने ते ट्विट डिलीट केलं होतं. त्यानंतर अक्षर पटेल जखमी झाल्यामुळे जडेजाचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला. पण तिनही सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही, राखीव खेळाडू म्हणून केवळ क्षेत्ररक्षण करताना तो दिसला.

आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आणि त्यामधून जडेजाला पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुखापतीतून सावरल्याने अक्षर पटेलची उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आणि जडेजाला पुन्हा बाहेर करण्यात आलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने सोमवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत त्याने दिलेलं कॅप्शन आणखीच हैराण करणारं आहे. या फोटोमध्ये तो धूर सोडताना दिसत आहे. त्याच्या चेह-याजवळ खूप धूर दिसत आहे. हा धूर कसा आला किंवा कशाचा आहे हे स्पष्ट होत नाही. पण यासोबत त्याने 'माझ्या पोलीस रिपोर्टनुसार, काल रात्री मी शानदार नाइट आउट केलंय...' असं कॅप्शन दिलं. या कॅप्शनसह फोटो शेअर केल्यामुळे नक्की जडेजाला काय म्हणायचंय याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

जडेजाने कॅप्शनबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही पण चाहत्यांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आराम देण्यात आला होता. दोघांच्या जागी संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला. पहिल्या तिनही सामन्यात या दोघांनी आपल्या गोलंदाजीने चांगलंच प्रभावित केलं आहे. त्यामुळे जडेजा आणि अश्विनचं पुनरागमन थोडं कठीण झालंय.

Web Title: Ravindra Jadeja due to being out of the team? Shared photo, controversy of fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.