रणजी क्रिकेट : विनयकुमारची हॅट््ट्रिक, मुंबई १७३ धावांत गारद

कर्णधार विनय कुमारने हॅट््ट्रिकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर कर्नाटकने ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबईचा १७३ धावांत खुर्दा उडवला आणि गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:52 AM2017-12-08T01:52:24+5:302017-12-08T01:52:51+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy: Vinay Kumar's hat-trick, Mumbai 173 for a girad | रणजी क्रिकेट : विनयकुमारची हॅट््ट्रिक, मुंबई १७३ धावांत गारद

रणजी क्रिकेट : विनयकुमारची हॅट््ट्रिक, मुंबई १७३ धावांत गारद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कर्णधार विनय कुमारने हॅट््ट्रिकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर कर्नाटकने ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबईचा १७३ धावांत खुर्दा उडवला आणि गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. प्रत्युत्तरात खेळताना कर्नाटकने दिवसअखेर १ बाद ११५ धावांची मजल मारली होती. कर्नाटकला मुंबईची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी केवळ ५८ धावांची गरज असून, त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. मयांक अग्रवालने शानदार फॉर्म कायम राखला असून तो नाबाद ६२ धावांवर खेळत आहे. त्याने आर. समर्थसोबत (४०) सलामीला ८३ धावांची भागीदारी केली. पहिला दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मयांकला कुनैन अब्बास (१२*) साथ देत होता.
नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात विनयकुमारने ३४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ याला करुण नायरकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर त्याने जय बिस्टा व आकाश परकार यांना तंबूचा मार्ग दाखवित रणजी ट्रॉफीमध्ये दुसºयांदा हॅट््ट्रिक नोंदवली.
यापूर्वी विनय कुमारने महाराष्ट्रविरुद्ध २००७मध्ये हॅट््ट्रिक नोंदवली होती. विनयकुमार जोगिंदर राव (३), अनिल कुंबळे व प्रीतम गंधे (प्रत्येकी २) यांच्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक हॅट््ट्रिक नोंदवणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. विनय कुमारव्यतिरिक्त एस. अरविंदने दोन तर अभिमन्यू मिथुन व गौतम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
कर्नाटकने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विनयकुमारच्या भेदक माºयापुढे मुंबईची अवस्था ६ बाद ४९ अशी झाली होती. मुंबईने १०० धावांचा पल्ला ओलांडला त्याचे सर्व श्रेय नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाºया धवल कुलकर्णी याला जाते. त्याने ७५ धावांची खेळी केली. त्याने शिवम मल्होत्रासोबत (७) अखेरच्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. कुलकर्णीव्यतिरिक्त मुंबई संघातर्फे अखिल हेरवाडकर (३२) व सूर्यकुमार यादव (१४) दुहेरी आकडा नोंदवण्यात यशस्वी ठरले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव ५६ षटकांत सर्वबाद १७३ (धवल कुलकर्णी ७१, अखिल हेरवाडकर ३२, सूर्यकुमार यादव १४; विनय कुमार ६-३४, श्रीनाथ अरविंद २-४५, के. गौतम व अभिमन्यू मिथुन प्रत्येकी १ बळी).
कर्नाटक पहिला डाव २९ षटकांत १ बाद ११५ (मयांक अग्रवाल खेळत आहे ६२, रविकुमार समर्थ ४०, कुनैन अब्बास खेळत आहे १२; शिवम दुबे १-११).

Web Title: Ranji Trophy: Vinay Kumar's hat-trick, Mumbai 173 for a girad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.