रणजी क्रिकेट : मुंबईकरांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित, निर्णायक सामन्यात त्रिपुराचा १० विकेट्सने उडवला धुव्वा

रणजी चषक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विक्रमी ५००वा सामना खेळल्यानंतर बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला चांगलेच झुंजावे लागले. बाद फेरीसाठी त्रिपुराविरुद्धविजय अनिवार्य असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकरांनी अपेक्षित कामगिरी करताना तिस-याच दिवशी १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 08:08 PM2017-11-27T20:08:49+5:302017-11-27T20:08:58+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy: Mumbaikars face back-to-back convincing win in Tripura by 10 wickets | रणजी क्रिकेट : मुंबईकरांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित, निर्णायक सामन्यात त्रिपुराचा १० विकेट्सने उडवला धुव्वा

रणजी क्रिकेट : मुंबईकरांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित, निर्णायक सामन्यात त्रिपुराचा १० विकेट्सने उडवला धुव्वा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : रणजी चषक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विक्रमी ५००वा सामना खेळल्यानंतर बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला चांगलेच झुंजावे लागले. बाद फेरीसाठी त्रिपुराविरुद्धविजय अनिवार्य असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकरांनी अपेक्षित कामगिरी करताना तिस-याच दिवशी १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित केली. या शानदार विजयासह ‘क’ मुंबईने २१ गुणांसह अव्वल स्थानही पटकावले असून, अन्य सामन्यात मध्य प्रदेशने मंगळवारी विजय मिळवल्यास ते एका गुणाने मुंबईला मागे टाकतील. मात्र अशा परिस्थितीतही मुंबई आणि मध्य प्रदेश यांची आगेकूच होईल. 
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या निर्णायक सामन्यात त्रिपुराने तिस्सºया दिवशी मुंबईला विजयासाठी केवळ  ६३ धावांचे माफक आव्हान दिले. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने एकदिवसीय सामन्याप्रमाणे हल्ला चढवताना केवळ २६ चेंडूत ८ खणखणीत चौकारांसह नाबाद ५० धावांची खेळी करत मुंबईला विजयी केली. पहिल्या डावातील शतकवीर जय बिस्त याने १२ धावांत नाबाद १३ धावा केल्या. पृथ्वीच्या जोरावर मुंबईने केवळ ६.२ षटकांमध्ये बाजी मारली. 
मुंबईने सोमवारी सकाळी सुरुवातीलाच आपला पहिला डाव डाव ८ बाद ४२१ धावांवर घोषित करुन त्रिपुरावर २२६ धावांची आघाडी घेतली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या त्रिपुराला पुन्हा एकदा स्वस्तात गुंडाळून मुंबईने आपला दबदबा राखला. पहिल्या डावात त्रिपुराचा अर्धा संघ बाद केलेल्या युवा वेगवान गोलंदाज आकाश पारकरला यावेळी ४३ धावांत केवळ एक बळी घेता आला. मात्र, दुसºया बाजूने अनुभवी धवल कुलकर्णी (४/६०) आणि कर्ष कोठारी (४/७२) यांनी ठराविक अंतराने त्रिपुराला बाद करत त्यांचा डाव २८८ धावांत संपुष्टात आणला. 
अडखळती सुरुवात झालेल्या त्रिपुराचा डाव ३ बाद ८४ असा घसरला होता. परंतु, स्मित पटेल (६८) आणि गुरिंदर सिंग (८२) यांनी चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत त्रिपुराला सावरले. यावेळी, सामना चौथ्या दिवसापर्यंत लांबणार असेच चित्र होते. मात्र, कोठारीची फिरकी आणि धवलची अचूकता या जोरावर मुंबईने ७५ धावांत ७ बळी मिळवत विजय जवळपास निश्चित केला. स्मितने १११ चेंडूत १० चौकारांसह ६८ धावा, तर यशपालने १२७  चेंडूत १२ चौकारांसह ८२ धावांची संयमी खेळी केली. तळाच्या फळीतील रजत डे यानेही ४७ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३० धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. 
यानंतर, पृथ्वी शॉने धमाकेदार फलंदाजी करताना तिसºयाच दिवशी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना बाद फेरीतील संघाची जागाही पक्की केली. 

संक्षिप्त धावफलक :
त्रिपुरा (पहिला डाव) : ६०.४ षटकात सर्वबाद १९५ धावा.
मुंबई (पहिला डाव) : १११ षटकात ८ बाद ४२१ धावा.
त्रिपुरा (दुसरा डाव) : ७८ षटकांत सर्वबाद २८८ धावा. (यशपाल सिंग ८२, स्मित पटेल ६८; धवल कुलकर्णी ४/६९, कर्ष कोठारी ४/७२).
मुंबई (दुसरा डाव) : ६.२ षटकात बिनबाद ६४ धावा. (पृथ्वी शॉ नाबाद ५०, जय बिस्त नाबाद १३). 

Web Title: Ranji Trophy: Mumbaikars face back-to-back convincing win in Tripura by 10 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.