केकेआरच्या फिरकीपटूंचा लाभ घेण्यास राजस्थान प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 04:28 AM2018-05-15T04:28:06+5:302018-05-15T04:28:06+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan will try to take advantage of the KKR spinners | केकेआरच्या फिरकीपटूंचा लाभ घेण्यास राजस्थान प्रयत्नशील

केकेआरच्या फिरकीपटूंचा लाभ घेण्यास राजस्थान प्रयत्नशील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले लिहितात...
दोन मजबूत आणि अनेकदा साधारण भासणाऱ्या दोन संघांदरम्यान ईडन गार्डन्सवर लढत होणार आहे. प्रतिष्ठा पणाला लागली असल्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची आशा आहे. कोलकाता संघाने लिलावामध्ये हुशारी दाखविली, पण त्यांना खेळाडूंच्या दुखापतीची झळ बसली. त्यांनी आपल्या उपलब्ध पर्यायांचा चांगला वापर केला, पण जेतेपद पटकावणारा संघ ठरण्यासाठी तुम्हाला सर्वंच विभागात वर्चस्व गाजवावे लागते. त्यांना जर योग्य संघाची निवड करता आली तर हा अत्यंत धोकादायक संघ आहे. विशेषता रसेलची चार षटके आणि कार्तिकचा शानदार फॉर्म बघितल्यानंतर तसे वाटते. त्याचसोबत नारायणही आपली छाप सोडत असून अन्य खेळाडूंचीही साथ लाभत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, केकेआरसाठी फिरकीपटूंचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. राजस्थान संघ या कमकुवत बाजूचा लाभ घेण्यास प्रयत्नशील राहील. सलग तीन विजयांमुळे राजस्थान संघाला सूर गवसला आहे. या संघाला आता कुठलेही लक्ष्य मोठे भासत नाही, पण बटलर लवकर बाद झाला तर संघ साधारण भासतो. ते अद्याप आघाडीच्या सर्वोत्तम सहा फलंदाजांचा शोध घेत आहेत. मोठे नाव व मोठी किंमत असलेल्या खेळाडूंना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याचा दोन बाजूंनी विचार करता येईल. ही चिंतेची बाब आहे किंवा त्यांना सूर गवसला तर मग काय होईल. जोफ्रा आर्चरची चार षटके संघासाठी उपयुक्त आहेत. आगामी दिवसांमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. बटलर व आर्चर यांच्या व्यतिरिक्त गौतमचा अपवाद वगळता उर्वरित खेळाडूंच्या कामगिरीबाबत अनिश्चितता आहे. साखळी फेरीत प्ले आॅफसाठी पात्रता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करणाºया संघाचे नशीब आता आगामी लढतींमध्ये त्यांची कामगिरी कशी होते, यावर अवलंबून राहील. (टीसीएम)

Web Title: Rajasthan will try to take advantage of the KKR spinners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.