रैनाची भारतीय संघात वापसी?  'यो-यो' फिटनेस टेस्टमध्ये झाला पास

पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे. परंतु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 04:02 PM2017-12-22T16:02:59+5:302017-12-22T16:05:36+5:30

whatsapp join usJoin us
Raina's return to the Indian squad? Hali 'Yo-Yo' Fitness Test Pass | रैनाची भारतीय संघात वापसी?  'यो-यो' फिटनेस टेस्टमध्ये झाला पास

रैनाची भारतीय संघात वापसी?  'यो-यो' फिटनेस टेस्टमध्ये झाला पास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - नॅशनल क्रिकेट अकॅडमी बंगळुरुत झालेल्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना पास झाला आहे. पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे. परंतु मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अजूनही संघ निवड झालेली नाही. त्यामुळे सुरेश रैनाने ही टेस्ट पूर्ण केल्याने मर्यादित षटकांच्या मालिकेच्या संघ निवडीसाठी तो उपलब्ध असेल.
नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगळूर येथे मी ही टेस्ट पास होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच प्रशिक्षक, सराव घेणारे आणि अधिकारी यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. एनसीएमधील प्रशिक्षण माझ्यामध्ये उत्साह वाढवते. तसेच माझ्या क्षमतेला मी पूर्णपणे वाव द्यावा यासाठी ते मला प्रेरणा देतात. असे सुरेश रैनाने ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत.
सध्या भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वच खेळाडूंना ही टेस्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच खेळाडूंची संघामध्ये निवड केली जाते. यासाठी खेळाडूंना किमान १६.१ इतके गुण मिळविणे आवश्यक आहे. तर भारताचा खेळाडू युवराज सिंग या टेस्टमध्ये सतत अयशस्वी होत होता. परंतु या यावेळेस त्याने १६.३ इतके गुण मिळवून ही टेस्ट यशस्वीपने पूर्ण केली आहे. 



 

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे? -
क्रिक ट्रॅकर वेबसाइटनुसार यो यो फिटनेस टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ जेन्स बँग्सबो यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला आहे. यात लेवल एक आणि दोन असे प्रकार आहेत. 

कशी वापरली जाते? - 
लेवल एक हा प्रकार अगदी बीप टेस्ट सारखाच आहे परंतु दोन मध्ये एकदम वेगाने धावणे आणि वेळोवेळी त्यात वाढ करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. यात 20 मीटर अंतरावर मार्किंग कॉन्ज ठेवले जातात. यात सुरुवातीला हळू हळू सुरु होणारे धावणे बीपच्या आवाजाप्रमाणे वाढत जाते. यात सर्व काम आजकाल सॉफ्टवेअरच्या मदतीने केले जाते.

किती वेळ ?
यो यो फिटनेस टेस्ट ही लेवल एक साठी सहा ते 20 मनिटे तर लेवल दोन मध्ये दोन ते दहा मिनिटे चालते. 

या खेळातही वापरली जाते ही पद्धत? -
गेली अनेक वर्ष फुटबॉल आणि हॉकी या खेळांमध्येही पद्धत वापरली जाते. या दोन्हीतील यो यो टेस्टचे निकाल हे क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आजकाल प्रो कबड्डीचा सराव करतानाही कबड्डीपटू ही पद्धत वापरताना दिसत आहेत.

क्रिकेट खेळणारा हा देश देश यात सर्वात पुढे आहे? -
क्रिकेटपटूंसाठी यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये 19.5 हा उत्तम स्कोर समजला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यात अग्रस्थानी असून त्यांचा साधारण स्कोर हा 21 असतो.

भारतीय खेळाडूंमध्ये कुणाचा आहे यो यो स्कोर सर्वात जास्त? -
भारतीय संघातील मनीष पांडे या खेळाडूचा यो यो स्कोर सर्वात जास्त आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजाचा क्रमांक लागतो. भारतीय संघातील हे खेळाडू बऱ्याच वेळा 21 च्या आसपास जातात.

90 च्या दशकातील भारतीय खेळाडूंचा यो यो टेस्टमधील स्कोर -
पूर्वीच्या काळात बीप टेस्ट ही खेळाडूंमध्ये एक फॅशन होती. भारतीय खेळाडू त्यावेळी या टेस्टमध्ये अंदाजे 16 ते 16.5 स्कोर करत असत. यात मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंग आणि अजय जडेजा आघाडीवर असत. 

Web Title: Raina's return to the Indian squad? Hali 'Yo-Yo' Fitness Test Pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.