Pulwama attack: आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार सर्व रक्कम

बैठकीमध्ये आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 04:44 PM2019-02-22T16:44:28+5:302019-02-22T16:45:08+5:30

whatsapp join usJoin us
Pulwama attack: Opening Ceremonies of the IPL cancled, all payments to martyrs' families | Pulwama attack: आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार सर्व रक्कम

Pulwama attack: आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार सर्व रक्कम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : गेल्या गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला आणि सारे भारतीय हादरले. त्यामुळेच आता आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी या कार्यक्रमासाठी लागणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय झाला. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यावेळी सांगितले की, " यावेळी आम्ही आयपीएलचा उद्घाटन सोहळा करणार नाही. या सोहळ्यासाठी आम्ही एक बजेट ठरवले होते. जी रक्कम आम्ही बजेटसाठी ठरवली होती, ती रक्कम आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहोत." 

देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे.  हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या होत्या. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी अचानक आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. आयपीएलच्या 12 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल. लोकसभा निवडणुक लक्षात घेता आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचेहंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. 

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Web Title: Pulwama attack: Opening Ceremonies of the IPL cancled, all payments to martyrs' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.