यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी युवा खेळाडूंना पृथ्वीने दिला सक्सेस मंत्र 

भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारताच्या युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ उगवत्या क्रिकेटपटूंसाठी यूथ आयकॉन बनलाय. सर्वच युवा क्रिकेटपटूंना त्याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू बनून भारतीय संघासाठी खेळायचे आहे. अशा सर्व युवा क्रिकेटपटूंना पृथ्वी शॉ याने सक्सेस मंत्र दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 02:22 PM2018-02-16T14:22:16+5:302018-02-16T14:34:40+5:30

whatsapp join usJoin us
prithvi Shaw give Mantras to youngsters to become successful cricketer | यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी युवा खेळाडूंना पृथ्वीने दिला सक्सेस मंत्र 

यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी युवा खेळाडूंना पृथ्वीने दिला सक्सेस मंत्र 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारताच्या युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ उगवत्या क्रिकेटपटूंसाठी यूथ आयकॉन बनलाय. सर्वच युवा क्रिकेटपटूंना त्याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू बनून भारतीय संघासाठी खेळायचे आहे. अशा सर्व युवा क्रिकेटपटूंना पृथ्वी शॉ याने सक्सेस मंत्र दिला आहे. यशस्वी क्रिकेटपटू व्हायचं असेल तर तुम्ही मैदानावर खेळताना क्रिकेटचा आनंद घ्या, भरपूर मेहनत करा आणि फिटनेसवर लक्ष द्या म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असं पृथ्वी म्हणाला. 

उगवता क्रिकेटपटू आणि भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा  कर्णधार पृथ्वी शॉ याने लोकमतच्या मुंबई कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. यावेळी पृथ्वीने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रश्नांचे तिरकस यॉर्कर सराईतपणे तटवले. तर बाउन्सरना चोख उत्तरं देत थेट सीमापार धाडले. आपल्या खेळामुळे उगवत्या क्रिकेटपटूंसाठी आदर्श ठरलेला पृथ्वी शॉ या खेळाडूंसाठी काय सल्ला देईल, असे विचारले असता तो म्हणाला, अनेक खेळाडूंना घरच्यांकडून चांगला पाठिंबा मिळत असतो. तर तुम्ही सर्वप्रथम क्रिकेट एन्जॉय करा. सगळेच जण काही भारतासाठी खेळू शकत नाहीत, पण तुम्ही खूप मेहनत करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला फिट ठेवा. सुरुवातीच्या काळात मलाही फिटनेसची समस्या जाणवली होती. त्यानंतर मी स्वत:च्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जे आज अंडर 12, अंडर 14 च्या संघातून खेळत आहेत, त्या खेळाडूंनी चांगलं खाणं आणि फिटनेसवर लक्ष द्यायला पाहिजे. 
 - पाहा पृथ्वीने लोकमतच्या टीमसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा -

19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावणा-या पृथ्वीला त्याचा आवडता कर्णधार कोण असा अवघड प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देण्यासाठी पर्याय मात्र त्याच्याकडे दोनच देण्यात आले होते, धोनी की कोहली? पृथ्वीने क्षणभर विचार केला आणि अखेर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्या धोनीलाच त्याने पसंती दिली. मुंबईकर पृथ्वी शॉला जेव्हा वडापाव की बर्गर असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता वडापावची निवड केली. सलमान, शाहरूख आणि आमिर खान यांच्यापैकी कोण आवडता अभिनेता असं विचारल्यावर सलमानचं नाव पृथ्वीने घेतलं. 'सचिन द बिलियन ड्रीम्स' की  'एस. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी' दोन्हीपैकी कोणता सिनेमा आवडला असं विचारल्यावर मात्र, दोन्ही सिनेमे अजून पाहिले नाहीत असं तो म्हणाला.

 

Web Title: prithvi Shaw give Mantras to youngsters to become successful cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.