Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का?

देशात-परदेशात खोऱ्यानं धावा कुटणारा कोहली वर्ल्ड चमक दाखवू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 02:57 PM2019-07-17T14:57:40+5:302019-07-17T14:59:40+5:30

whatsapp join usJoin us
Poll: Should Virat Kohli replace by Rohit Sharma as captain | Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का?

Poll: विराट कोहलीऐवजी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे द्यावी का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून झालेली एक्झिट भारतीयांची मनं दुखावून गेली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणूनच विराटसेनेकडे पाहिलं जात होतं. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी 'अव्वल' कामगिरी करून दाखवली. परंतु, मोक्याच्या क्षणी अपेक्षांचं ओझं ना विराटला पेलवलं, ना आपल्या इतर वीरांना. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी देशात-परदेशात खोऱ्यानं धावा कुटणारा कोहली वर्ल्ड चमक दाखवू शकला नाही. शिवाय दोन वर्षांपासून सुरू असलेला चौथ्या क्रमांकाची तिढा सोडवण्यातही तो अपयशी ठरला. उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर, भारतीय संघात धुसफूस असल्याची चर्चाही जोरात आहे. त्यामुळे कोहलीकडून कर्णधारपद काढून घ्यावं आणि ही धुरा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे सोपवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तुमचं मत तुम्ही कुणाच्या पारड्यात टाकू इच्छिता?

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का?

हो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (2073 votes)
नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (1031 votes)

Total Votes: 3104




 

Web Title: Poll: Should Virat Kohli replace by Rohit Sharma as captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.