भारतीय जाहिरात विश्वाची ' ही ' खेळाडू आहे राणी

सध्याच्या घडीला खेळाडूंना मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा भारतीय जाहीरात विश्वाचा राजा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 07:37 PM2018-03-22T19:37:46+5:302018-03-23T10:14:52+5:30

whatsapp join usJoin us
This player is 'Queen' of indian advertise world | भारतीय जाहिरात विश्वाची ' ही ' खेळाडू आहे राणी

भारतीय जाहिरात विश्वाची ' ही ' खेळाडू आहे राणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकोहलीकडे 2016 साली 20 जाहिराती होत्या, यामधून तो 120 कोटी कमावत होता. 2017 साली त्याच्याकडे 19 जाहीराती होत्या, म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत एक जाहीरात कमी झाली होती. पण या 19 जाहीरातींमधून कोहलीने तब्बल 150 कोटी रुपये कमावले आहेत.

मुंबई : सध्याच्या घडीला खेळाडूंना मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा भारतीय जाहीरात विश्वाचा राजा आहे, तर ही बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू ही राणी समलजी जात आहे. कारण सिंधूकडे सध्या 11 कंपन्यांच्या जाहिराती आहे, यामधून तिला 30 कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळत आहे.

कोहलीकडे 2016 साली 20 जाहिराती होत्या, यामधून तो 120 कोटी कमावत होता. 2017 साली त्याच्याकडे 19 जाहिराती होत्या, म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत एक जाहिराती कमी झाली होती. पण या 19 जाहिरातींमधून कोहलीने तब्बल 150 कोटी रुपये कमावले आहेत. याचाच अर्थ कोहलीचा जाहिराती क्षेत्रातला भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे. ईएसपी प्रॉपर्टीज और स्पोर्ट्स पॉवर यांच्या अहवालानुसार भारतीय क्रीडा क्षेत्रातील कोहली हा जाहिरांतींमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे.

भारताचा यष्टीरक्षक धोनीकडे सध्याच्या घडीला 13 जाहीराती आहे. या 13 जाहिरातींमधून धोनीला 55-60 कोटी रुपये मिळत आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिनकडे सध्या 9 जाहीराती आहेत. या 9 जाहिरातींमधून सचिनला 25-30 कोटी रुपये मिळतात. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे सध्याच्या  घडीला 7 जाहीराती आहेत. या सात जाहिरातींमधून पंड्याला 3.5-4 कोटी रुपये मिळत आहेत. भारताच्या युवा (19-वर्षांखालील) क्रिकेट संघातील पृथ्वी शॉ आणि इशाम किशन यांनी 2017 साली आपली पहिली जाहिराती केली आहे.

Web Title: This player is 'Queen' of indian advertise world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.