‘पिंक डे’ जनजागृती मोहीम प्रशंसनीय, विजयी लय कायम राखण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:12am

दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या वन-डेमध्ये ‘पिंक डे’च्या पार्श्वभूमीवर आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहे. स्तन कॅन्सरसाठी यजमान संघाची जनजागृती मोहीम आहे. त्यासाठी संघ गुलाबी पोशाखामध्ये वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो.

- सुनील गावस्कर लिहितात... दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या वन-डेमध्ये ‘पिंक डे’च्या पार्श्वभूमीवर आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहे. स्तन कॅन्सरसाठी यजमान संघाची जनजागृती मोहीम आहे. त्यासाठी संघ गुलाबी पोशाखामध्ये वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो. उल्लेखनीय बाब ही की या मोहिमेसाठी खेळल्या गेलेल्या वन-डेमध्ये दक्षिण आफ्रिका संघ नेहमीच जिंकलेला आहे. या व्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्सचे संघात पुनरागमन होत असून दक्षिण आफ्रिका संघासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. डिव्हिलियर्सने ‘पिंक डे’ वन-डेमध्ये नेहमी चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी दिली आहे. क्रिकेटच्या नावाखाली विविध कंपन्यांकडून पैसा उकळत असल्याची बीसीसीआयवर नेहमी टीका होत असते. बीसीसीआयने आॅस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून बोध घेत सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. वन-डे लढतीदरम्यान अशा प्रकारच्या मोहिमेमुळे जनजागृतीला चांगली मदत होते. त्याचप्रमाणे ‘सोन्याचे अंडे’ देणारी क्रिकेट लीगमध्येही (आयपीएल) अशा प्रकारची सामाजिक जागृती निर्माण करणारी मोहीम राबविता येऊ शकते. या स्पर्धेत फ्रॅन्चायसीने आपल्या खेळाडूंवर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यातील काही रक्कम जनजागृती मोहिमेसाठी खर्च केली जाऊ शकते. या मुद्यावर मुंबई इंडियन्स शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये मोठे योगदान देत आहे. निळ्या पोशाखातील छोट्या बालकांना बघितल्यानंतर स्टेडियमचा माहोल शानदार होतो. त्याचप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु ‘ग्रीन डे’ साजरा करीत असतो. अशा प्रकारे प्रत्येक फ्रॅचायसीने सामाजिक भावना जपण्यासाठी पुढाकार घेतला तर चांगला आदर्श निर्माण होईल. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणारे कुलदीप यादव यजुवेंद्र चहला यांचा मारा खेळण्यास अडचण भासत आहे. या व्यतिरिक्त त्यांना विराट कोहलीला रोखण्यात अपयश येत आहे. भारतीय कर्णधार सध्या शानदार फॉर्मात आहे. मैदानावर त्याची खरी लढत कॅगिसो रबाडासोबत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या एकमेव गोलंदाजाला विराट सांभाळून खेळत आहे. शिखर धवनही फॉर्मात आहे. अशा स्थितीत यजमान संघापुढे ‘पिंक डे’ला आपली विजयी मोहीम कायम राखणे आव्हान आहे. (पीएमजी)

संबंधित

धोनीने किदाम्बीला दिली स्वाक्षरीयुक्त बॅट
CSK vs KXIPe :रैनाची धुव्वाधार फलंदाजी; चेन्नईचा पंजाबवर 5 गडी राखून विजय
‘प्ले आॅफ’साठी मुंबईचे आज ‘करा किंवा मरा’
पंजाबला मोठ्या विजयाची गरज
खर्चाच्या समान नियमाचा आयपीएलला लाभ

क्रिकेट कडून आणखी

‘प्ले आॅफ’साठी मुंबईचे आज ‘करा किंवा मरा’
पंजाबला मोठ्या विजयाची गरज
खर्चाच्या समान नियमाचा आयपीएलला लाभ
SRH vs KKR, IPL 2018 LIVE UPDATE : हैदराबादवर विजयासह कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल
IPL 2018, RR vs RCB Live: विराट सेनेचे आव्हान संपुष्टात; विजयासह राजस्थान चौथ्या स्थानी

आणखी वाचा