पाकिस्तानचा विश्व एकादशला धक्का , टी-२० सामना : बाबर आझमचा अर्धशतकी तडाखा

बाबर आझमने (८६) केलेल्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माºयाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी-२० सामन्यात विश्व एकादश संघाचा २० धावांनी पराभव केला. पाकिस्तानने दिलेल्या १९७ धावांचा पाठलाग करताना विश्व एकादशने २० षटकांत ७ बाद १७७ धावांची मजल मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 02:17 AM2017-09-13T02:17:46+5:302017-09-13T02:17:46+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan's Twenty20 World Cup: Babar Azam's half-century knock | पाकिस्तानचा विश्व एकादशला धक्का , टी-२० सामना : बाबर आझमचा अर्धशतकी तडाखा

पाकिस्तानचा विश्व एकादशला धक्का , टी-२० सामना : बाबर आझमचा अर्धशतकी तडाखा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लाहोर : बाबर आझमने (८६) केलेल्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माºयाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी-२० सामन्यात विश्व एकादश संघाचा २० धावांनी पराभव केला. पाकिस्तानने दिलेल्या १९७ धावांचा पाठलाग करताना विश्व एकादशने २० षटकांत ७ बाद १७७ धावांची मजल मारली.
गद्दाफी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून विश्व एकादशचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने यजमानांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. बाबरच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित षटकांत ५ बाद १९७ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना विश्व एकादश संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली आला. त्यांचा कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. हाशिम आमला (२६), टिम पेन (२५), कर्णधार प्लेसिस (२९) आणि डॅरेन सॅमी (नाबाद २९) यांनी विश्व एकादशच्या विजयासाठी अपयशी झुंज दिली. परंतु पाकिस्तानच्या नियंत्रित गोलंदाजीपुढे सारेच अपयशी ठरले. सोहेल खान, रुमान रईस आणि शादाब खान यांनी प्रत्येकी २ बळी घेत पाकिस्तानचा विजय साकारला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मॉर्नी मॉर्केलने फखर झमानला (८) बाद करून यजमानांना धक्का दिला. परंतु, यानंतर बाबरने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना विश्व एकादश संघाची धुलाई केली. अहमद शेहझादनेही ३४ चेंडूंत ३९ धावा काढल्या. या दोघांनी दुसºया विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. बेन कटिंगने शेहझादला बाद करून ही जोडी फोडली. परंतु, एका बाजूने बाबरने आपला दांडपट्टा सुरू ठेवल्याने पाकिस्तानच्या धावगतीत फारसा फरक आला नाही. ५२ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८६ धावांचा तडाखा देणाºया बाबरला इम्रान ताहिरने बाद केले. परंतु, यानंतर शोएब मलिकने अवघ्या २० चेंडूत ४ चौकार व २ षटकार ठोकत ३८ धावांची आक्रमक खेळी केली. थिसारा परेराने मलिकचा त्रिफळा उडवल्यानंतर इमाद वासिमने ४ चेंडूत २ षटकार खेचताना नाबाद १५ धावांची खेळी केली. परेराने २, मॉर्केल, कटिंग, ताहिर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १९७ धावा (बाबर आझम ८६, अहमद शेहझाद ३९, शोएब मलिक ३८; थिसारा परेरा २/५१) वि.वि. विश्व एकादश : २० षटकांत ७ बाद १७७ धावा (डॅरेन सॅमी नाबाद २९, फाफ डू प्लेसिस २९, हाशिम आमला २६, टिम पेन २५; सोहेल खान २/२८, शादाब खान २/३३, रुमान रईस २/३७)

Web Title: Pakistan's Twenty20 World Cup: Babar Azam's half-century knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.