Pakistan's star cricketer Umar Akmal died, rumors rain on social media | पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू उमर अकमलचा मृत्यू, सोशल मीडियावर अफवांचा पाऊस
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू उमर अकमलचा मृत्यू, सोशल मीडियावर अफवांचा पाऊस

लाहोर :  पाकिस्तानच्या लाहोरमध्ये काही दिवसांपासून हिंसा सुरू आहे, त्यामुळे येथे तणावग्रस्त परिस्थिती आहे. या दरम्यान, पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू उमर अकमल याचा या हिंसेदरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर आलं. मंगळवारी पाकिस्तानात उमर अकमल सारखाच चेहरा असणा-या एका व्यक्तीला जखमी अवस्थेत रूग्णालयात भरती करण्यात आलं. त्या व्यक्तीचा फोटो पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्ये भलताच व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यास सुरूवात केली. काहींनी तर त्याच्या आत्म्यास शांती लाभो असं म्हणत रिट्विटही केलं. 
सोशल मीडियावर स्वतःच्या मृत्यूची अफवा पाहून उमर अकमलच समोर आला. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करताना, मला काहीच झालेलं नाही मी ठणठणीत आहे. ही निव्वळ अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, असं म्हणाला.  तसंच त्याने त्याच्या चाहत्यांना ट्विटला जास्तीत जास्त रिट्विट करा जेणेकरून ही अफवा आणखी पसरणार नाही असं आवाहन केलं.
29 नोव्हेंबरला नॅशनल टी-20 कपच्या उपांत्य सांन्यात मी खेळेल हे देखील त्याने स्पष्ट केलं. लाहोर व्हाइट्स या संघाविरोधात उमर अकमलच्या संघाचा सामना होणार आहे. 30 नोव्हेंबरला या टुर्नामेंटचा अंतिम सामना आहे. सध्या उमर अकमलला पाकिस्तान संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून तो पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

 


Web Title: Pakistan's star cricketer Umar Akmal died, rumors rain on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.