आमचे वेगवान गोलंदाजही चमक दाखवतील : श्रीधर

ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ आमच्या वेगवान माºयाला देखील मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत लंकेच्या वेगवान गोलंदाजांसारखीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी व्यक्त केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:48 AM2017-11-18T00:48:55+5:302017-11-18T00:49:16+5:30

whatsapp join usJoin us
 Our fast bowlers will also shine: Shridhar | आमचे वेगवान गोलंदाजही चमक दाखवतील : श्रीधर

आमचे वेगवान गोलंदाजही चमक दाखवतील : श्रीधर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ आमच्या वेगवान मा-याला देखील मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत लंकेच्या वेगवान गोलंदाजांसारखीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी व्यक्त केला.
दुसºया दिवशी खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीधर म्हणाले,‘लकमलच्या नेतृत्वात लंकेचा वेगवान मारा सरस ठरत असल्याचे पाहून आमच्या गोटातही उत्साहाचे वातावरण आहे. शमी आणि भुवी हे अशा अनुकूल स्थितीत मारा करण्यास उत्सुक आहेत. तीन दिवसांच्या खेळात २७० षटकांचा खेळ शिल्लक असून या कसोटीचा निकाल लागू शकतो. हवामानाने साथ दिल्यास सामना फारच रोमहर्षक अवस्थेत जाऊ शकतो. भारतीय संघाची पडझड झाली तरी आम्ही ड्रेसिंग रुममध्ये अपयशी खेळाडृंचा उत्साह कायम राखण्याचे काम करीत आहोत. पावसामुळे ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू एकमेकांकडे आपले अनुभव शेअर करतात.’
पुजाराच्या संघर्षपूर्ण खेळीचे कौतुक करीत श्रीधर पुढे म्हणाले,‘पुजाराने ड्रॉईव्ह, आणि शॉर्ट मिडआॅफवर फटके मारले. त्यात तो यशस्वी ठरला. गेल्या तीन वर्षात विपरीत स्थितीतील त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरावी. कुठल्याही परिस्थितीवर मात करणारा तो फलंदाज आहे. अंगावर येणारे चेंडू टोलविणे, स्विंग आणि सीम गोलंदाजांचा सामना करणे हे पुजाराच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे.’ (वृत्तसंस्था)
तर कोहली संधी सोडणार नाही...
विराट कोहली जोपर्यंत फिट आहे आणि विश्रांतीची गरज आहे, असे त्याचे शरीर त्याला सांगणार नाही तोपर्यंत सामना खेळण्याची एकही संधी तो सोडणार नाही. भारत लवकरच द. आफ्रिका दौरा करणार असल्याने कोहलीला लंकेविरुद्ध विश्रांती द्यायला हवी होती, असे जाणकारांना वाटते. पण विराट आवश्यक असेल तेव्हाच विश्रांती घेईल. देशाचे प्रतिनिधित्व करण्यास प्रत्येक खेळाडू सज्ज असतो. प्रत्येक सामना खेळण्याची त्याची इच्छा असते. विराटचेही तसेच आहे. कुणाला विश्रांती द्यायची आणि कुणाला खेळवायचे हे व्यवस्थापनाचे काम असले तरी कोहली न थकता खेळत राहणारा खेळाडू आहे. - एम. आर. श्रीधर, क्षेत्ररक्षण कोच.

Web Title:  Our fast bowlers will also shine: Shridhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.