आफ्रिका नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर, ४७ वर्षांनंतर कांगारूंविरुद्ध मालिका विजयाची संधी

दुखापतग्रस्त खेळाडूंसह खेळतानाही दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्धचौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेतली. आफ्रिकेने चहापानापर्यंत ६ बाद ३४४ धावांवर आपला डाव घोषित करुन आॅस्ट्रेलियापुढे ६१२ धावांचे विक्रमी लक्ष्य उभारले. यासह आफ्रिकेला तब्बल ४७ वर्षांनी कांगारूंविरुद्ध मालिका विजयाची संधी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:27 AM2018-04-03T02:27:52+5:302018-04-03T02:27:52+5:30

whatsapp join usJoin us
 Opportunity to S. Africa win a series against Australi after 47 years | आफ्रिका नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर, ४७ वर्षांनंतर कांगारूंविरुद्ध मालिका विजयाची संधी

आफ्रिका नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर, ४७ वर्षांनंतर कांगारूंविरुद्ध मालिका विजयाची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहानसबर्ग - दुखापतग्रस्त खेळाडूंसह खेळतानाही दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्धचौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेतली. आफ्रिकेने चहापानापर्यंत ६ बाद ३४४ धावांवर आपला डाव घोषित करुन आॅस्ट्रेलियापुढे ६१२ धावांचे विक्रमी लक्ष्य उभारले. यासह आफ्रिकेला तब्बल ४७ वर्षांनी कांगारूंविरुद्ध मालिका विजयाची संधी आहे. दरम्यान, कर्णधार फाफ डु प्लेसिस (१२०), सलामीवीर डीन एल्गर ( ८१) यांनी चौथ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी या मालिकेतील सर्वश्रेष्ठ ठरली.
दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिध्दी व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार यजमान संघाचे तीनही प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. मॉर्ने मॉर्कलचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो गोलंदाजी करू शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे. कागिसो रबाडाच्या कमरेला दुखापत झाली असून वर्नन फिलेंडरच्या मांडीचा सांधा दुखावला आहे. यामुळेच मोठी आघाडी घेतल्यानंतर यजमानांनी फलंदाजी करण्यास पसंती दिली.
या मालिकेत आफ्रिका २-१ ने आघाडीवर आहे. १९६९-७0 नंतर पहिल्यांदाच यजमान संघ आॅस्ट्रेलियाला आपल्या जमिनीत पराजित करण्याचा विक्रम प्रस्तापित करण्याच्या तयारीत आहे. कर्णधार डु प्लेसिसने मालिकेत कर्णधाराला साजेशी कामगिरी केली आहे. या आधी झालेल्या मालिकांमध्ये सात डावांत त्याने फक्त ५५ धावा केल्या होत्या. आज त्याने वैैयक्तिक आठवे आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसरे शतक ठोकले. त्याने १७८ चेंडूत १८ चौैकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२0 धावा केल्या. पॅट कमिन्स आॅस्ट्रेलियातर्फे यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५८ धावांत ४ गडी बाद केले. त्याने या सामन्यात १४१ धावांत ९ गडी बाद केले आहेत. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.

आॅसी अडचणीत

भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्टेÑलियाची अडखळती सुरुवात झाली. खराब प्रकाशमानामुळे चौथ्या दिवशी खेळ थांबविण्यात आला तेव्हा आॅसीने ३ बाद ८८ धावा केल्या होत्या. मॅथ्यू रेनशॉ (५), उस्मान ख्वाजा (७) स्वस्तात बाद झाले. जो बर्न्सने (४२) झुंजार खेळी केली. विशेष म्हणजे पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मोर्कलने भेदक मारा करत रेनशॉ, बर्न्स यांना बाद केले.

Web Title:  Opportunity to S. Africa win a series against Australi after 47 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.