मतदार यादीसाठी केवळ १२ संघटना सरसावल्या, बीसीसीआय-सीओएचा पाठपुरावा कायम

प्रशासकांच्या समितीने (सीओए) सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही बीसीसीआयकडून मान्यताप्राप्त केवळ १२ संघटनांनी मतदार यादी वेबसाईटवर टाकलेली आहे, तर १५ संघटना यादी सादर करण्यात अपयशी ठरल्यात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:15 AM2017-08-23T03:15:27+5:302017-08-23T03:15:53+5:30

whatsapp join usJoin us
Only 12 outfits for the voters list, the follow-up to the BCCI-COA | मतदार यादीसाठी केवळ १२ संघटना सरसावल्या, बीसीसीआय-सीओएचा पाठपुरावा कायम

मतदार यादीसाठी केवळ १२ संघटना सरसावल्या, बीसीसीआय-सीओएचा पाठपुरावा कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : प्रशासकांच्या समितीने (सीओए) सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही बीसीसीआयकडून मान्यताप्राप्त केवळ १२ संघटनांनी मतदार यादी वेबसाईटवर टाकलेली आहे, तर १५ संघटना यादी सादर करण्यात अपयशी ठरल्यात. त्याचसोबत ज्या २१ संघटनांनी (असोसिएट व एफिलिएटसह) सीओएसोबत संपर्क साधला त्यांत १० संघटनांकडे वेबसाईटबाबत काही माहिती नाही. सीओएने ही माहिती देण्यासाठी संघटनांना ८ आॅगस्टपर्यंतचा वेळ दिला होता.
ज्या प्रमुख संघटनांनी अद्याप कुठलेही उत्तर दिले नाही, त्यांत कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांची हरियाणा क्रिकेट संघटना, बीसीसीआयचे माजी वादग्रस्त अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची तमिळनाडू क्रिकेट संघटना आणि अपात्र ठरिण्यात आलेले माजी सचिव निरंजन शाह यांची सौराष्ट्र क्रिकेट संघटना यांचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या पदाधिकाºयांनी प्रश्न उपस्थित केला, की ‘सातत्याने आपली वेबसाईट तयार करण्याची सूचना देण्यात आल्यानंतरही काही संघटनांनी वेबसाईट नसल्याचे सांगितले आहे. एक वेबसाईट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो?’
सीओएने अनेकदा संवाद साधताना काही संघटनांना आपल्या वेबसाईटवर सर्व माहिती देण्यास सांगितले होते. त्यात मतदार यादीचा समावेश होता. त्यात १५ संघटनांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांची पंजाब क्रिकेट संघटना, आसाम क्रिकेट संघटना, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना, महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांनी अद्याप सीओएकडे कुठलीही यादी सादर केलेली नाही. हरियाणा व महाराष्ट्र आपल्या यादीला अंतिम रूप देत असल्याचे वृत्त आहे. मतदारांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर या संघटना सीओएकडे ती सादर करतील. सचिव अमिताभ चौधरी यांनी आंशिक माहिती दिली आहे; पण झारखंड संघटनेने मतदार यादी दिलेली नाही. उत्तर विभागातून हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरने मतदार यादी सादर केली आहे. दक्षिण विभागातून केरळ, आंध्र प्रदेश आणि हैदराबाद संघटनांनी आपली मतदार यादी अपडेट केलेली आहे. पूर्व विभागातून बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) आपल्या सर्व १२१ मतदार संघटनांची यादी सादर केली आहे. नॅशनल क्रिकेट क्लब, ओडिशा आणि त्रिपुरा यांनी अद्याप मतदार यादी वेबसाईटवर टाकलेली नाही. पश्चिम विभागातून केवळ मुंबईने माहिती सादर केली आहे, तर गुजरात व बडोदा यांना करण्यात अपयश आले आहे. या संघटनांसोबत संपर्क साधण्यात आला होता.
मध्य विभागातून रेल्वे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ यांनी मतदार यादी वेबसाईटवर टाकलेली आहे. असोसिएट सदस्यांमध्ये केवळ मणिपूरने यादी सादर केलेली आहे,
तर सिक्कीम व बिहार क्रिकेट
संघटनेने अद्याप ही कृती केलेली
नाही. एफिलिएट सदस्यांमध्ये मेघायल व नागालँड यांनी
आपली मतदार यादी वेबसाईटवर टाकलेली आहे. (वृत्तसंस्था)

उत्तर न मिळालेल्या संघटना...
ज्या संघटनांकडून उत्तर मिळालेले नाही त्यांत अरुणाचल क्रिकेट संघटना, आसाम क्रिकेट संघटना, छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटना, क्रिकेट क्लब आॅफ इंडिया, दिल्ली अँड जिल्हा क्रिकेट संघटना, गोवा क्रिकेट संघटना, हरियाणा क्रिकेट संघटना, भारतीय विद्यापीठ संघटना, कर्नाटक क्रिकेट संघटना, महाराष्ट्र क्रिकेट संघटना, पंजाब क्रिकेट संघटना, सौराष्ट्र क्रिकेट संघटना, सेना क्रीडा नियंत्रण बोर्ड, तमिळनाडू क्रिकेट संघटना आणि त्रिपुरा क्रिकेट संघटना यांचा समावेश आहे.

Web Title: Only 12 outfits for the voters list, the follow-up to the BCCI-COA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.