ओम फट् 'साहा'... वृद्धिमानची वादळी खेळी, १४ षटकारांची आतषबाजी करत २० चेंडूत झंझावाती शतक

साहाने झंझावाती खेळी करताना युवराजचा विक्रमही मोडला. साहाने एका षटकात सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 04:44 PM2018-03-24T16:44:52+5:302018-03-24T18:00:33+5:30

whatsapp join usJoin us
Om fattah Saha ... The windfall winds of the rise, the fireworks of 14 balls in the 20th century | ओम फट् 'साहा'... वृद्धिमानची वादळी खेळी, १४ षटकारांची आतषबाजी करत २० चेंडूत झंझावाती शतक

ओम फट् 'साहा'... वृद्धिमानची वादळी खेळी, १४ षटकारांची आतषबाजी करत २० चेंडूत झंझावाती शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - वादळ घोंघावतं म्हणजे नेमकं काय होतं, हे आज टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यानं दाखवून दिलं. तो आला, झपाटल्यागत खेळला आणि क्रिकेटमध्ये आजवर कुणालाही न जमलेला पराक्रम त्यानं करून दाखवला. टी-२० इंटर क्लब सामन्यात या उगवत्या ताऱ्यानं १४ षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी करत झंझावाती शतक ठोकलं आणि सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे तारे चमकले.  यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने वादाळी खेळी करत 20 चेंडूत शतक करण्याचा कारनामा केला आहे. टी20 इंटर क्लब सामन्यात साहाने 14 षटकारांच्या साह्याने तुफानी फटकेबाजी करत शतकी खेळी केली. साहाने झंझावाती खेळी करताना युवराजचा विक्रमही मोडला. साहाने एका षटकात सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही केला आहे. 

जेसी मुखर्जी चषकातील एका सामन्यात साहाने मोहन बागान या संघाकडून खेळताना साहाने फक्त 20 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी केली. बंगाल नागपुर रेलवे (बीएनआर) या संघाविरुद्ध त्याने फटकेबाजी केली.  साहाच्या या वादळी खेळीच्या बळावर मोहन बागान संघ 152 धावांचे लक्ष सात षटकात पार केले . साहाने आपल्या या वादळी खेळी दरम्यान 14 षटकार आणि चार चौकार लगावले. 

साहाने आपल्या शतकी खेळीदरम्यान 14 षटकार आणि 4 चौकार लगावले. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने फक्त दोन धावा दोन वेळा घेतल्या. सातव्या षटकात साहाने अमन प्रसादच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार लगावले. प्रसादने या षटकात एक वाईड चेंडू टाकल्यामुळं या षटकात 37 धावा वसूल झाल्या. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत साहाने आपलं शतक ठोकलं. 

मोहन बागान संघाकडून खेळताना साहाने 510 च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या. अर्धशतक 12 चेंडूत पूर्ण केलं तर शतकपूर्णकरण्यासाठी त्याने त्यानंतर फक्त 8 चेंडू घेतले. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना साहा म्हणाला की, ही खेळी विक्रमात सामील होईल की नाही माहित नाही. पण आयपीएलमध्ये चांगली कामगीरी करण्याचा प्रयत्न असेल सर्व प्रकराचे फटके मारण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो.  

Web Title: Om fattah Saha ... The windfall winds of the rise, the fireworks of 14 balls in the 20th century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.