कलिजा खलास झाला... 'ती' आली, हसली अन् RCB-SRH मॅचमध्ये तीच जिंकली!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:31 AM2019-05-06T10:31:04+5:302019-05-06T10:31:21+5:30

whatsapp join usJoin us
Not Virat Kohli Or RCB's Win Over SRH, The Internet Is Talking About This Girl For Some Reason | कलिजा खलास झाला... 'ती' आली, हसली अन् RCB-SRH मॅचमध्ये तीच जिंकली!

कलिजा खलास झाला... 'ती' आली, हसली अन् RCB-SRH मॅचमध्ये तीच जिंकली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची ही लढत बंगळुरूने 4 विकेट राखून जिंकली. शिमरोन हेटमायर ( 75) आणि गुरकिरत मन सिंग ( 65) यांनी फटकेबाजी करून बंगळुरूला 175 धावांचे लक्ष्य पार करून दिले. या विजयासह RCBने आयपीएलच्या 12व्या मोसमाचा निरोप घेतला. पण, RCBच्या या विजयापेक्षा प्रेक्षकांमध्ये असलेल्या 'त्या' तरुणीचीच चर्चा अधिक रंगली. सोशल मीडियावरही त्या तरुणीचीच हवा होती.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी फार कर्तृत्व असावे लागते असे काहीच नाही. या तरुणीच्या बाबतितही असेच काहीसे घडले. बंगळुरूचा सामना पाहायला आलेल्या या तरुणीच्या दिशेने दोन सेकंदापुरता का होईना कॅमेरामनने कॅमेरा वळवला आणि बघता बघता ती चांगलीच फेमस झाली. 



त्यानंतर या मुलीचा शोध सुरू झाला. दीपिका घोष असे या तरुणीचे नाव आहे. बंगळुरू आणि हैदराबाद लढतीपूर्वी या दीपिकाचा इंस्टाग्रामवरील चाहतावर्ग हाताच्या बोटावर मोजण्या इतकाच होता. मात्र, सामना संपेपर्यंत हाच चाहतावर्ग 1.5 लाखांपर्यंत पोहोचला.  




Web Title: Not Virat Kohli Or RCB's Win Over SRH, The Internet Is Talking About This Girl For Some Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.