भूतकाळाचा नाही, तर भविष्याबाबत विचार करतो

सर्वत्र रंगत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ११ वे पर्व असून आरसीबीसोबत माझे आठवे वर्ष आहे. आता मात्र या लीगचे स्वरुप सुरुवातीच्या तुलनेत भव्यदिव्य व व्यापक असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी आयपीएल भव्य व चमकदार होत आहे. क्रिकेटचा हा वैश्विक उत्सव आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 05:46 AM2018-04-08T05:46:42+5:302018-04-08T14:21:22+5:30

whatsapp join usJoin us
 Not for the past but for the future | भूतकाळाचा नाही, तर भविष्याबाबत विचार करतो

भूतकाळाचा नाही, तर भविष्याबाबत विचार करतो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एबी डिव्हिलियर्स लिहितात...

सर्वत्र रंगत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ११ वे पर्व असून आरसीबीसोबत माझे आठवे वर्ष आहे. आता मात्र या लीगचे स्वरुप सुरुवातीच्या तुलनेत भव्यदिव्य व व्यापक असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी आयपीएल भव्य व चमकदार होत आहे. क्रिकेटचा हा वैश्विक उत्सव आहे.
दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे प्रयाण करणाऱ्या विमानात असताना रोमांचित होतो. माझ्यासोबत आरसीबीसोबत जुळलेला क्विंटन डिकॉक प्रवास करीत होता. आम्ही मनोरंजनासाठी एखाद्या चित्रपटाची निवड करण्यापूर्वीच आम्हाला सेल्फीसाठी चाहत्यांचा गरडा पडला. यादरम्यान एका चाहत्यामुळे क्विंटन डिकॉकच्या हातातील शीतपेयाचा आम्हा सर्वांवर वर्षाव झाला. त्यानंतरही मात्र कुणी राग व्यक्त केला नाही. कोलकातामध्ये आम्ही संघाची निवासव्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो तरी आम्ही लीगची रंगत अनुभवत होतो. येथे रविवारी केकेआरविरुद्ध खेळल्या जाणाºया आरसीबीच्या सलामीच्या लढतीची तयारी सुरू झालेली होती. यंदाच्या मोसमात आरसीबी संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल साधला आहे. लौकिकाला साजेशी कामगिरी करीत आम्ही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.
दरम्यान, काही खडतर बाबींची आठवण झाली. गेल्या वर्षी ईडन गार्डनमध्ये आम्ही केवळ ४९ धावांत बाद झालो होतो. संघातील कुणीच ही बाब विसरलेले नाही, पण आम्ही भूतकाळाकडे न बघता भविष्याबाबत विचार करतो. आमचे लक्ष्य गोलंदाजी व फलंदाजीच्या जोरावर आक्रमण करण्याचे आहे. मी काही आठवड्यांपूर्वीच आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला, पण माझ्यासाठी भारतात खेळणे नेहमीच सन्मानाची बाब ठरली आहे. कारण येथील माहोल व समर्पण काही विशेष असते. त्यामुळे जल्लोष करणे थांबायला नको, असे वाटते. दरम्यान, सीनिअर खेळाडू असल्यामुळे मी स्वत:ला शांत राहण्यास सांगतो. भावनेवर नियंत्रण राखण्यास सक्षम नसलेल्या उत्साही युवा खेळाडूंप्रमाणे तुमचे वर्तन नसावे. त्यामुळे मी संघाच्या रूममध्ये दाखल झालो. तेथे आरसीबीचे खेळाडू केकेआरविरुद्ध खेळल्या जाणाºया लढतीसाठी रणनीती आखण्यात गुंतले होते. केकेआर संघाचे प्रशिक्षक जॅक्स कॅलिस आहेत. त्यांचे माझ्या कारकिर्दीत प्रत्येक पावलावर महत्त्वाचे योगदान आहे. त्यानंतर मला माझ्या कर्णधाराचा चेहरा दिसला. त्याला बघितल्यानंतर मी म्हटले, हाय विराट, तुला भेटून आनंद झाला. पुन्हा एकदा शरीरात रोमांच निर्माण झाला.  

Web Title:  Not for the past but for the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.