न्युझीलंडच्या पोरी लय भारी!

सलग तीन सामन्यात चारशे पेक्षा जास्त धावांची विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 05:28 PM2018-06-18T17:28:01+5:302018-06-18T17:28:01+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand's womens done very good job | न्युझीलंडच्या पोरी लय भारी!

न्युझीलंडच्या पोरी लय भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आकाश नेवे
न्युझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भीम पराक्रम केला आहे. न्युझीलंडच्या महिला संघाने सलग तीन सामन्यात चारशेपेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला. ४९०, ४१८ आणि ४४० अशा धावा अनुक्रमे सामन्यात न्युझीलंडच्या महिला संघाने आयर्लंड विरोधातील मालिकेत केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात महिला किंवा पुरूषांच्या इतर कोणत्याही संघाने हा विक्रम केलेला नाही.

न्युझीलंड आणि आयर्लंडची ही मालिका तशी विक्रमांचीच ठरली. या मालिकेत संघाने जसा विक्रम केला. तसा मालिकेतील अखेरच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिने झळकावलेले द्विशतक देखील विक्रमी ठरले. २१ वर्षांनंतर अमेलिया हिने महिला क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. त्यासोबतच आणखी एक विक्रम महत्त्वाचा ठरतो या तिन्ही सामन्यात आयर्लंडच्या संघाला तिनशेपेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. आयर्लंडच्या महिला संघाला तिन्ही सामन्यात अनुक्रमे ३४६, ३०६ आणि ३०५ धावांनी पराभव पत्करावा लागला. तर आयर्लंडच्या महिलांना एकाही सामन्यात दीडशेपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यांनी पहिल्या सामन्यात १४४, दुसऱ्या सामन्यात ११२ आणि तिसऱ्या सामन्यात १३५ धावा केल्या.

Web Title: New Zealand's womens done very good job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.