मुंबई इंडियन्सच्या यशामागची मेहनत; आयपीएल चॅम्पियन्सच्या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर लाँच

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स हे नाव आघाडीवर असले तरी मुंबई इंडियन्सने त्यांना तोडीसतोड टक्कर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:08 PM2019-02-20T15:08:33+5:302019-02-20T15:09:06+5:30

whatsapp join usJoin us
Netflix releases official trailer of cricket fever: Mumbai Indians | मुंबई इंडियन्सच्या यशामागची मेहनत; आयपीएल चॅम्पियन्सच्या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर लाँच

मुंबई इंडियन्सच्या यशामागची मेहनत; आयपीएल चॅम्पियन्सच्या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर लाँच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स हे नाव आघाडीवर असले तरी मुंबई इंडियन्सने त्यांना तोडीसतोड टक्कर दिली आहे. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदकं पटकावणाऱ्या संघांत चेन्नई व मुंबई प्रत्येकी 3 चषकांसह आघाडीवर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा मुंबई आणखी एक जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज आहे आणि 2019च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध ते पहिला सामना खेळणार आहेत. चेन्नईप्रमाणे मुंबई इंडियन्सचाही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या या यशामागच्या मेहनतीवर लवकरच डॉक्युमेंटरी येणार आहे आणि त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

बॉलिवूड आणि क्रिकेट हे न तुटणारे कनेक्शन आहे. जिथे क्रिकेट तिथे बॉलिवूड आणि जिथे बॉलिवूड तिथे क्रिकेट... हे समीकरण गेली अनेक वर्ष दिसत आहे. आयपीएलमुळे हे नातं आणखी घट्ट झाले आहे. त्यामुळेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्ये ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने मुंबई इंडियन्सवर डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. आठ भागाच्या या डॉक्युमेंटरीत मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. 1 मार्च 2019 ला या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग प्रसिद्ध होणार आहे.

नेटफ्लिक्सने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. या आठ भागांमध्ये मुंबई इंडियन्सच्या ( 2013, 2015 व 2017) तीन जेतेपदांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. पण, मैदानावर घडलेल्या घटनांपलिकडे मैदानाबाहेरील प्रसंगांवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता ताणून धरणारी नक्की असेल. 



कोणत्याही प्रतिस्पर्धींचा सामना करण्यापूर्वी खेळाडूंवर असलेले दडपण, चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी त्यांची असलेली धडपड, आदी सर्व गोष्टी या डॉक्युमेंटरीत असणार आहेत. ''दुनिया हिला देंगे हम'' हे ब्रिदवाक्य घेऊनच ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पाहा ट्रेलर

मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 
24 मार्च    मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स    मुंबई
28 मार्च    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू
30 मार्च    किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स    मोहाली
3 एप्रिल    मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई

Web Title: Netflix releases official trailer of cricket fever: Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.