माझ्या चुकीमुळे ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी राखता आली नाही - नील हार्वे

डॉन ब्रॅडमन यांना केवळ चार धावांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये १०० धावांची सरासरी राखता आली नाही. त्यांचे सहकारी नील हार्वे गेल्या ७० वर्षांपासून यासाठी स्वत:ला दोषी मानत जीवन कंठत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:57 AM2018-10-08T02:57:03+5:302018-10-08T02:57:52+5:30

whatsapp join usJoin us
With my fault, Bradman could not maintain an average of 100 - Neil Harvey | माझ्या चुकीमुळे ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी राखता आली नाही - नील हार्वे

माझ्या चुकीमुळे ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी राखता आली नाही - नील हार्वे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : डॉन ब्रॅडमन यांना केवळ चार धावांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये १०० धावांची सरासरी राखता आली नाही. त्यांचे सहकारी नील हार्वे गेल्या ७० वर्षांपासून यासाठी स्वत:ला दोषी मानत जीवन कंठत आहेत. या महान फलंदाजाला हा पराक्रम करता आला नाही त्यासाठी मीसुद्धा जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे.
ब्रॅडमन अखेरचा डाव खेळण्यासाठी मैदानात दाखल झाले त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये १०० ची सरासरी राखण्यासाठी त्यांना केवळ चार धावांची गरज होती. होलिजने ब्रॅडमन यांना त्यांच्या अखेरच्या डावात शून्यावर क्लिनबोल्ड केले होते आणि त्यांची सरासरी ९९.९४ वर थांबली.
हार्वेलाही त्यावेळी याची काही कल्पना नव्हती, पण आता मात्र त्यांना आकडेवारीतील हा महत्त्वाचा पराक्रम करण्यापासून रोखण्यासाठी जबाबदार असल्याचे वाटते. लीड््सवर झालेल्या या लढतीत युवा हार्वेने पहिल्या डावात ११२ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात तो खेळपट्टीवर आला त्यावेळी आॅस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ चार धावांची गरज होती. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. ब्रॅडमन त्यावेळी दुसºया टोकावर १७३ धावा काढून खेळत होते. जर तो विजयी चौकार त्यांच्या बॅटमधून निघाला असता तर त्यावेळी त्यांची सरासरी १०० झाली असती.
हार्वे ८ आॅक्टोबरला ९० वा वाढदिवस साजरा करतील, आजही त्यांना त्या चार धावांबाबत खेद वाटतो. हार्वे म्हणाले, ‘लीड््सवर फटकावलेल्या त्या चार धावांमुळे आजही अपराधी असल्यासारखे वाटते.’ (वृत्तसंस्था)

Web Title: With my fault, Bradman could not maintain an average of 100 - Neil Harvey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.