Womens T20 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची फटकेबाजी, भारतीय महिलांचा मालिका विजय

Womens T20 : भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर 4-0 असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:04 PM2018-09-25T15:04:28+5:302018-09-25T15:05:03+5:30

whatsapp join usJoin us
Mumbaikar Jemimah Rodrigues play brilliant game, Indian womens won series against srilanka | Womens T20 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची फटकेबाजी, भारतीय महिलांचा मालिका विजय

Womens T20 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची फटकेबाजी, भारतीय महिलांचा मालिका विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजेमिमा रॉड्रीग्जला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान.

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर 4-0 असा विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 51 धावांनी विजय मिळवला. मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जने पुन्हा एकदा ( 46) दमदार फटकेबाजी केली. तिला हरमनप्रीतने 63 धावांची खेळी करताना चांगली साथ दिली. भारताच्या 156 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 105 धावांवर तंबूत परतला. 
 



जेमिमाने 31 चेंडूंत 46 धावा चोपल्या आणि हरमनप्रीतने 38 चेंडूंत 63 धावांची आतषबाजी केली. फलंदाजांच्या कामगिरीनंतर फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा, पूनम यादव आणि राधा यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले.  


 


Web Title: Mumbaikar Jemimah Rodrigues play brilliant game, Indian womens won series against srilanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.