मुंबईच्या 'या' खेळाडूकडे भारत 'A' संघाचे नेतृत्व

भारत A आणि ऑस्ट्रेलिया A यांच्यात 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत महिलांची तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:50 PM2018-10-11T14:50:48+5:302018-10-11T14:51:22+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai punam raut lead India' A ' women's cricket team | मुंबईच्या 'या' खेळाडूकडे भारत 'A' संघाचे नेतृत्व

मुंबईच्या 'या' खेळाडूकडे भारत 'A' संघाचे नेतृत्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारत A आणि ऑस्ट्रेलिया A यांच्यात 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत महिलांची तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ गुरूवारी जाहीर करण्यात आला. भारताच्या A संघाचे नेतृत्व मुंबईच्या पुनम राऊतकडे सोपवण्यात आले आहे. वन डे मालिकेनंतर उभय संघांमध्ये ट्वेंटी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा संघ नंतर जाहीर करण्यात येईल. 

भारतीय A महिला संघ : पुनम राऊत ( कर्णधार), प्रिया पुनिया, देविका वैद्य, मोना मेश्राम, तनुश्री सरकार, सुषमा वर्मा ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, सुश्र दिब्यादर्शनी, सी, प्रथ्युषा, रिमालक्ष्मी एक्का, शिखा पांडे, नेत्रा एल., हेमाली बोरवणकर, कविता पाटील, प्रिती बोस.
 


Web Title: Mumbai punam raut lead India' A ' women's cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.