मुंबईची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जचे अर्धशतक, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय

मुंबईच्या जेमिमा रॉड्रीग्जच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर पाच विकेट राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:24 PM2018-09-22T14:24:49+5:302018-09-22T14:26:08+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai cricketer Jemima Rodriguez fifty, Indian women beat Sri Lanka | मुंबईची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जचे अर्धशतक, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय

मुंबईची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जचे अर्धशतक, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : मुंबईच्या जेमिमा रॉड्रीग्जच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर पाच विकेट राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. जेमिमाचे 12 व्या ट्वेंटी-20 सामन्यातील हे दुसरे अर्धशकत ठरले.

जेमिमाने पहिल्या सामन्यात 15 चेंडूंत 36 धावांची तुफानी खेळी केली होती. तोच फॉर्म कायम राखताना तिने शनिवारी 40 चेंडूंत 57 धावा चोपल्या. श्रीलंकेच्या 8 बाद 131 धावांचा पाठलाग करताना भारताने पाच विकेट आणि दहा चेंडू राखून विजय मिळवला.  



 

 

Web Title: Mumbai cricketer Jemima Rodriguez fifty, Indian women beat Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.