मुंबईः टीम इंडियाचे वीर सध्या आयपीएलच्या 'रन'संग्रामात पराक्रम गाजवत आहेत. महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, शिखर धवन, हरभजनसिंग आपल्या कामगिरीनं चाहत्यांना खूश करत असताना, त्यांची मुलंही आपल्या खट्याळ लीलांनी क्रिकेटप्रेमींची मनं जिंकून घेत आहेत. या मुला-मुलींना आपला 'द ग्रेट' बाबा जितका प्रिय आहे तितकंच आईशीही त्यांचं छान, घट्ट बाँडिंग असल्याचं आयपीएल सामन्यांवेळी पाहायला मिळतं. या क्रिकेटपटूंच्या पत्नींनाही 'सुपरमॉम'चं म्हटलं पाहिजे. कारण, पतीदेव वर्षातले अर्ध्याहून अधिक दिवस घराबाहेर, वेगवेगळ्या दौऱ्यांवर असताना, त्या घराची जबाबदारी खंबीरपणे सांभाळतात, आईसोबत बाबाचं कर्तव्यही पार पाडतात. आजच्या 'मदर्स डे'निमित्त, क्रिकेटवीरांच्या मुलांचं त्यांच्या आईसोबत असणाऱ्या गोड नात्याचं दर्शन घडवणारा हा अल्बम... 


मातृमुखी...सदासुखी...

हरभजनसिंगची पत्नी गीता बसरा आणि लेक हिनाया (उजवीकडे)

सुरेश रैनाची पत्नी प्रियांका आणि लेक ग्रेसिया

'गब्बर' शिखर धवनची पत्नी आएशा (उजवीकडे) आणि लेक जोरावर... रोहित शर्माची पत्नी रितिकासोबत त्याची चांगलीच गट्टी जमली होती...  

लाघवी झीवाची आईशी मस्ती...

गोड... गोंडस... निरागस...

दोन बाहुल्या... हरभजनसिंगची लेक आणि सुरेश रैनाची परी


Web Title: Mothers Day: ziva, hinaya, grecia, zorawar bonding with their mothers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.