मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

कोलकाता पोलीसाचे शमीला समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 10:15 AM2018-04-18T10:15:33+5:302018-04-18T10:15:33+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Shami to be interrogated by Kolkata police on Wednesday after complaint by wife Hasin Jahan | मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : पत्नी हसीन जहांच्या गृहकलह आणि दगबाजीच्या आरोपांना सामोरे जात असलेला क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता पोलीसने समन्स बजावले आहे. त्यामुळे तो कोलकातामध्येच थांबला आहे, तर त्याचा संघ बेंगळुरूसाठी रवाना झाला.  बंगाल क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले की, सोमवारी रात्री ईडन गार्डन्समध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा हा वेगवान गोलंदाज २१ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी संघासोबत गेलेला नाही.

अधिका-याने सांगितले की, ‘डेअरडेव्हिल्स संघ दुपारी जवळ जवळ ३ वाजता रवाना झाला; पण शमीला मात्र जाता आले नाही. कारण कोलकाता पोलीसने त्याला समन्स बजावले आहे. डेअरडेव्हिल्ससोबत त्याच्या जुळण्याबाबत अद्याप कुठले अपडेट मिळालेले नाही.’ कोलकाता पोलीस सूत्राने सांगितले की, शामीला सोमवारी बोलविण्यात आले होते; पण त्या वेळी उपस्थित राहण्यात त्याने असमर्थता व्यक्त केली आणि आपले वकील व अधिका-यांच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली.’ गेल्या महिन्यात पत्नीने गृहकलह व दगाबाजीच्या आरोपानंतर शमी प्रथमच कोलकातामध्ये आला.

काय आहे प्रकरण
हसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.

Web Title: Mohammed Shami to be interrogated by Kolkata police on Wednesday after complaint by wife Hasin Jahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.