मधल्या फळीची भारताला चिंता, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना आज

फलंदाजी-गोलंदाजीत भक्कम वाटणारा भारतीय संघ विश्वचषकाआधी मधल्या फळीची चिंता दूर सारण्याच्या प्रयत्नात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:26 AM2018-10-21T02:26:37+5:302018-10-21T02:27:22+5:30

whatsapp join usJoin us
The middle order is a worry for India, the first match against the West Indies today | मधल्या फळीची भारताला चिंता, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना आज

मधल्या फळीची भारताला चिंता, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना आज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी : फलंदाजी-गोलंदाजीत भक्कम वाटणारा भारतीय संघ विश्वचषकाआधी मधल्या फळीची चिंता दूर सारण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी उद्या रविवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात काही प्रयोग होऊ शकतात.
इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरू होण्यास आठ महिने शिल्लक आहेत. भारताकडे मधल्या फळीची समस्या दूर करण्यासाठी १८ वन-डे शिल्लक असून, चौथ्या स्थानावरील नियमित फलंदाज शोधण्यासाठी अनेकांना संधी देण्यात आली. यापैकी एकही फलंदाज पसंतीस उतरलेला नाही.
कर्णधार कोहली मधल्या फळीत प्रयोग करण्याची शक्यता असून, ऋषभ पंत याला स्थान देण्यात आले आहे. ऋषभने कसोटीत दमदार फलंदाजीद्वारे निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. पंतला दिनेश कार्तिकऐवजी स्थान देण्यात आले असून, चांगल्या कामगिरीचे त्याच्यावर दडपण असेल. अलीकडे प्रभावी कामगिरी करू न शकणाऱ्या धोनीकडेदेखील लक्ष असेल. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी विश्वचषकापर्यंत धोनीच नंबर वन यष्टिरक्षक असेल, असे जाहीर केले आहे. धोनीने यंदा जे १० वन-डे खेळले त्यात त्याच्या धावा अगदी नगण्य होत्या.
नंबर चारसाठी अंबाती रायुडू याचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. तळाच्या स्थानाला रवींद्र जडेजाची सेवा मिळू शकेल. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह पहिल्या दोन वन-डेत खेळणार नसल्याने मोहम्मद शमी, उमेश यादव आणि खलील अहमद यांच्या वेगवान माºयावर विजयाचे समीकरण विसंबून असेल. विंडीजकडेही अनुभवी मार्लन सॅम्युअल्स, कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर, तसेच वेगवान केमार रोच यांचा भरणा आहे.
बारसपारा स्टेडियमवर हा केवळ दुसरा आंतरराष्टÑीय सामना असेल. मागच्या वर्षी भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात टी-२० सामना झाला होता. आॅस्ट्रेलिया संघाच्या बसवरील दगडफेकीमुळे हा सामना चर्चेत राहिला. (वृत्तसंस्था)
>हेड
टू
हेड
एकूण सामने : १२१
भारत विजयी : ५६
वेस्ट इंडिज विजयी : ६१
टाय : ०१
निकाल नाही : ०३
या मालिकेत विराट कोहलीला १० हजारी मनसबदार होण्याची संधी आहे. त्याला वन-डेमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २२१ धावांची आवश्यकता आहे. त्याने ९७७९ धावा सचिनपेक्षा कमी डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. सचिनने २५९ डावांत १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
शिखर धवनने या मालिकेत
१७७ धावा केल्या, तर तो
सर्वात जलद ५ हजार
धावा करणारा भारतीय
फलंदाज ठरेल.
>उभय संघ
यातून निवडणार
भारत (अंतिम १२ खेळाडू) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि खलील अहमद.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलेन, सुनील अंबरिश, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिमोन हेटमेयर, शाय होप, अलजारी जोसेफ, किरॉन पॉवेल, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युुअल्स, ओशेन थॉमस आणि ओबेड मॅकॉय.

Web Title: The middle order is a worry for India, the first match against the West Indies today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.