7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम

युवीनं 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:32 PM2019-03-26T15:32:38+5:302019-03-26T15:42:52+5:30

whatsapp join usJoin us
Makarand Patil, son of a farmer, hits 7 sixes in 7 ball, break Yuvraj Singh record | 7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम

7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. युवीनं 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मुंबईच्या खेळाडूंनं केली. मुंबईच्या 23 वर्षीय मकरंद पाटीलनं एक पाऊल पुढे टाकताना 7 चेंडूंत 7 षटकार खेचले. 

शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या मकरंदने सलग सात चेंडूंवर ( एका षटकात सहा)  सात षटकार खेचले. विवा सुपरमार्केटमध्ये विक्रेता असलेल्या मकरंदने टाईम्स शिल्ड स्पर्धेच्या F गटात विवा सुपरमार्केटसंघासाठी 26 चेंडूंत 84 धावा चोपल्या आणि महिंद्रा लॉजिस्टीक्स संघाचा पराभव केला. विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं ही विक्रमी खेळी केली. 



 

मकरंदने सांगितले की,''मी चौथा षटकार खेचले तेव्हा एका षटकात सहा चेंडू सीमारेषेपार पाठवेन असे वाटले नव्हते. पण मी जेव्हा सहावा षटकार खेचला तेव्हा सहकारी आनंदाने ओरडू लागले. तेव्हा आपण क्रीझवर नसून चंद्रावर असल्याचे मला भासत होते. सातव्या चेंडूवर खेचलेला षटकार माझ्यासाठी विशेष होता. 

युवी आणि रवी शास्त्री यांच्यानंतर सहा चेंडूंत 6 षटकार खेचणाऱ्या खेळाडूंमध्ये मकरंदने स्थान पटकावले. शास्त्रींनी एका स्थानिक सामन्यात अशी कामगिरी केली होती. मकरंदच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. तो आजही शेतीत आपल्या वडीलांना मदत करतो.  

Web Title: Makarand Patil, son of a farmer, hits 7 sixes in 7 ball, break Yuvraj Singh record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.