महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भरली बँकांची थकित रक्कम

कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये बँक आॅफ महाराष्ट्रने गहुंजे येथील स्टेडियमचा प्रतिकात्मक ताबा घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:09 PM2019-03-22T14:09:05+5:302019-03-22T14:10:09+5:30

whatsapp join usJoin us
Maharashtra Cricket Association paid some loan to banks | महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भरली बँकांची थकित रक्कम

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भरली बँकांची थकित रक्कम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्यावर असलेल्या विविध बँकांच्या कर्जाच्या ६९.५३ कोटी रूपयांच्या थकित रकमेपैकी २३.५२ कोटींचा हप्ता बुधवारी भरला.
गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियम उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये बँक आॅफ महाराष्ट्रने स्टेडियमचा प्रतिकात्मक ताबा घेतला होता. बीसीसीआयने एमसीएला निधी दिल्यावर तत्काळ बँकांचे हप्ते भरण्यात आले. आता विविध बँकांचे मिळून सुमारे ४६ कोटींचे कर्ज एमसीएवर शिल्लक आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’सोबत बोलताना एमसीएचे सचिव रियाझ बागवान म्हणाले, ‘‘येत्या २ महिन्यांत बँक आॅफ बडोदा आणि कर्नाटक बँकेचे संपूर्ण कर्ज फेडले जाईल. त्यानंतर बँक आॅफ महाराष्ट्र आणि आंध्र बँकेचे कर्ज शिल्लक असेल. त्याचे हप्तेही वेळेत भरण्याला आमची प्राथमिकता असेल. बीसीसीआयकडून एमसीएला सुमारे ८१ कोटी रूपये येणे आहेत. त्यातून हे हप्ते भरले जातील.’’

Web Title: Maharashtra Cricket Association paid some loan to banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.