महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम 

फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 04:18 PM2018-07-21T16:18:20+5:302018-07-21T16:18:48+5:30

whatsapp join usJoin us
Maharaj's feat, 61 years later Africa's bowler's hit record | महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम 

महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात 129 चेंडूंत 9 विकेट्स घेतल्या. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेरची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झाले. रंगना हेरथ आणि अकिला धनंजया यांनी 10व्या विकेटसाठी केलेल्या 74  धावांची भागिदारी त्याने संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात 9 विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. 
द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी
ह्यूज टेयफिल्ड - 9/113 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1957
केशव महाराज - 9/129 वि. श्रीलंका, कोलंबो 2018
गॉडफ्रे लॉरेन्स - 8/53 वि. न्यूझीलंड, जोहान्सबर्ग 1961
लान्स क्युजनर - 8/64 वि. भारत, कोलकाता 1996
ह्यूज टेयफिल्ड - 8/69 वि. इंग्लंड, डर्बन 1957
टिप स्नूक - 8/70 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1906
अॅलन डोनाल्ड - 8/71 वि. झिम्बाब्वे, हरारे 1995
 



महाराजच्या या विक्रमी कामगिरीवर आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाणी फेरले. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 338 धावांच्या उत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव 124 धावांवर गडगडला. 

Web Title: Maharaj's feat, 61 years later Africa's bowler's hit record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.