नवी दिल्ली : क्युरेटर पैशाच्या लोभापोटी भ्रष्टाचारात सामील असणे, ही नवी बाब नाही. याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. कमी वेतनावर काम करणारे मैदान कर्मचारी आणि क्युरेटर अशा प्रकारच्या प्रलोभनाला लवकर बळी पडतात, असे मत बीसीसीआयच्या पिच समितीचे माजी चेअरमन व्यंकट सुंदरम यांनी व्यक्त केले.
पिचतज्ज्ञ आणि माजी प्रथमश्रेणी खेळाडू अशी ओळख असलेले सुंदरम हे १९७० ते ८०च्या दशकात आज निलंबित झालेले एमसीए क्युरेटर आणि माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांच्याविरुद्ध खेळलेले आहेत. निलंबनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुंदरम म्हणाले, ‘‘खेळाडू आणि अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता पुढील लक्ष्य क्युरेटर असतील, ही शक्यता होतीच. माझ्या माहितीनुसार, खेळाडू आणि अधिका-यांच्या तुलनेत क्युरेटरना फार कमी वेतन मिळते.’’ (वृत्तसंस्था)
>मैदान कर्मचा-यांची अवस्था बिकट
बीसीसीआय पाचही क्षेत्रांच्या क्युरेटरना महिन्याला ५० हजार इतके वेतन देते. राज्य संघटना आपापल्या क्युरेटरला जे वेतन देते, ते फारच कमी असते. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना वर्षाला १२ लाख रुपये मिळतात. पंच आणि मॅच रेफ्री यांना प्रत्येक सामन्यासाठी २० हजार रुपये दिले जातात. भारतीय खेळाडूंची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.
प्रथम श्रेणी खेळणाºयांना लाखो रुपये मिळतात; पण मैदान कर्मचाºयांची अवस्था बिकट आहे. बीसीसीआय अनुभवाच्या आधारे क्युरेटरला ३५ ते ७० हजार इतके वेतन देते. राज्य संघटना मात्र
२० हजार किंवा त्यापेक्षा कमी वेतन देत असल्याचे व्यंकट सुंदरम यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.