लोकेश राहुलला निवडकर्त्यांनी बळ द्यावे : सौरव गांगुली

श्रीलंकेने दिल्लीतील तिसरी कसोटी व त्यानंतर धर्मशाला येथील पहिल्या वन डेत जी झकास कामगिरी केली, त्यामुळे वन डे आणि टी-२० मालिकेत हा संघ मुसंडी मारेल, असे जाणकारांना वाटत होते. तथापि, रोहित शर्मा व शिखर धवन यांची फटकेबाजी तसेच चहल अ‍ॅन्ड कंपनीचा भेदक मारा या दुहेरी चक्रव्यूहात अडकलेल्या लंका संघाला भारताच्या वर्चस्वाला शह देता आला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:15 AM2017-12-22T01:15:53+5:302017-12-22T01:16:52+5:30

whatsapp join usJoin us
 Lokesh Rahul should be encouraged by selectors: Sourav Ganguly | लोकेश राहुलला निवडकर्त्यांनी बळ द्यावे : सौरव गांगुली

लोकेश राहुलला निवडकर्त्यांनी बळ द्यावे : सौरव गांगुली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सौरव गांगुली लिहितात...
श्रीलंकेने दिल्लीतील तिसरी कसोटी व त्यानंतर धर्मशाला येथील पहिल्या वन डेत जी झकास कामगिरी केली, त्यामुळे वन डे आणि टी-२० मालिकेत हा संघ मुसंडी मारेल, असे जाणकारांना वाटत होते. तथापि, रोहित शर्मा व शिखर धवन यांची फटकेबाजी तसेच चहल अ‍ॅन्ड कंपनीचा भेदक मारा या दुहेरी चक्रव्यूहात अडकलेल्या लंका संघाला भारताच्या वर्चस्वाला शह देता आला नाही.
खरेतर मोहालीतील रोहितच्या खेळीमुळे लंकेच्या खेळाडूंचे अवसान गळाले. त्याआधी दौºयाच्या मधल्या टप्प्यात भारताविरुद्ध त्यांच्यात आत्मविश्वास संचारला होता. पण रोहित वादळाने लंका संघ नेस्तनाबूत झाला. रोहितची खेळी मर्यादित षटकांच्या सामन्यात मी पाहिलेली अप्रतिम खेळी होती. अशा फटकेबाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाचे मनोधैर्य ढासळते. लंकेचही तेच झाले. दुसरीकडे काळजीवाहू कर्णधार या नात्याने ‘करा किंवा मरा’ अशा लढतीत द्विशतक ठोकताच रोहितला मानसिक बळ लाभले.
रोहित फटकेबाजी करतो तेव्हा त्याला पाहणे प्रेक्षणीय असते. वन डेत दडपणातही तो धोकादायक फलंदाज आहे. रोहितप्रमाणे तिसºया वन डेत आणि कालच्या टी-२० सामन्यात धवनची फटकेबाजी बहारदार होती. त्यामुळे लंकेचा संघ लढतीत कुठेही संघर्ष करताना दिसलाच नाही. लोकेश राहुलने धावा काढल्याचे मला समाधान आहे. तो चांगला खेळाडू आहे. निवडकर्त्यांनी त्याला आत्मविश्वास द्यावा. वन डेत तो माझ्यामते चौथ्या स्थानावर फिट फलंदाज बनू शकतो. सामन्यागणिक त्याच्या खेळीत आत्मविश्वास संचारू शकतो.
माझ्या मते भारतीय संघाचा प्रत्येक आघाडीवर आत्मविश्वास वाढत आहे. प्रतिस्पर्धी कमकुवत असला तरी भारतीय संघाला या कामगिरीचा लाभ द. आफ्रिका दौºयात होईल. विराटच्या पुनरागमनानंतर या कामगिरीत आणखीच भर पडणार हे निश्चित. (गेमप्लान)

Web Title:  Lokesh Rahul should be encouraged by selectors: Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.