पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व

न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 01:41 AM2017-12-04T01:41:02+5:302017-12-04T01:41:28+5:30

whatsapp join usJoin us
Leaders of the Indian team on Earth Shawk | पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व

पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.
बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर बंगलुरू येथे ८ ते २२ डिसेंबरदरम्यान होणार आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी भारतीय संघाने २०००, २००८ व २०१२, तर आॅस्ट्रेलियाने १९८८, २००२ व २०१० मध्ये विजेतेपद जिंकले होते. मुंबईचा पृथ्वी शॉ आणि बंगालचा पॉरेल यांना रणजी करंडक सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे दोघे १२ डिसेंबरपासून प्रशिक्षण शिबिरात दाखल होतील.

संघ असा
पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, ऋयान पराभ, आर्यण जुयाल (यष्टिरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पॉरेल, हार्विक देसाई (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, अनुकुल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव; राखीव : ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, ऊर्विल पटेल, आदित्य ठाकरे.

Web Title: Leaders of the Indian team on Earth Shawk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.