भारतीय क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीचा अपवाद वगळता भारतीय क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार राहिले. भारतीय संघाने जवळजवळ सर्वंच संघांविरुद्ध विजय मिळवले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:00 AM2017-12-27T00:00:28+5:302017-12-27T00:00:42+5:30

whatsapp join usJoin us
The last year of Indian cricket is fantastic | भारतीय क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार

भारतीय क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-सौरव गांगुली लिहितात...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीचा अपवाद वगळता भारतीय क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार राहिले. भारतीय संघाने जवळजवळ सर्वंच संघांविरुद्ध विजय मिळवले. आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश या सर्वच संघांविरुद्ध विराट अँड कंपनीने यश मिळवले. श्रीलंका संघाला मायदेशात व त्यांच्या भूमीतही पराभूत केले.
या कालावधीत भारतीय संघाने केवळ विजयच मिळवले नाहीत तर विराटच्या नेतृत्वाखाली संघासाठी नवे मापदंड तयार केले. विराट खेळाडूंबाबत संयमी आहे. तो प्रत्येक खेळाडूला त्याची प्रतिभा दाखविण्याची पूर्ण संधी देतो. भविष्यातील योजना लक्षात घेऊन तो कार्य करतो. आगामी १८ महिन्यांच्या कालावधीत विराट अँड कंपनीची परीक्षा आहे. विराट अँड कंपनीला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि शेवटी इंग्लंडमध्ये २०१९ होणारी विश्वकप स्पर्धा खेळायची आहे.
कर्णधार विराट कोहलीसह मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल आणि केदार जाधव यांच्यासारखे खेळाडू विदेशात फलंदाजीमध्ये छाप सोडतील, अशी आशा आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याची प्रगती झपाट्याने होत आहे. विदेशात जर त्याने छाप सोडली तर तो अष्टपैलू म्हणून खºया अर्थाने परिपक्व होईल. वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या तयार करताना विचार करावा लागणार आहे. कारण त्यांना कल्पना आहे की, त्यांना प्रतिस्पर्धी संघाच्या युवा वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
फिरकीपटूंमध्ये चहलने लक्ष वेधले आहे. त्याचा संयम बघता त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. आगामी १८ महिने अश्विनसाठीही परीक्षेचे आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यास तो सज्ज असेल, असा मला विश्वास आहे.
भारतीय संघ तुलनेने कमकुवत असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वर्चस्व गाजवल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौºयासाठी रवाना होत आहे, पण भारताने आगामी खडतर चाचणीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी केली असल्याचे निदर्शनास येते. प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली असली तरी रोहित शर्माने मात्र वेगळाच ठसा उमटवला आहे. त्याने विदेशातही कामगिरीत सातत्य राखायला हवे. कर्णधारासह रोहितही क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. (गेमप्लॅन)

Web Title: The last year of Indian cricket is fantastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.