kuldeep yadav apologises unsolicited instagram post after account hacked | आक्षेपार्ह पोस्टसाठी कुलदीप यादवने मागितली चाहत्यांची माफी, सांगितलं कारण...
आक्षेपार्ह पोस्टसाठी कुलदीप यादवने मागितली चाहत्यांची माफी, सांगितलं कारण...

मुंबई : भारतीय संघाचा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून झालेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत चाहत्यांची माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं कुलदीपने स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर कुलदीपने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली. 

माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून थोड्यावेळापूर्वी शेअर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी मी माफी मागतो. माझं इन्स्टाग्राम हॅक झालं होतं. स्वतःचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी यापुढे आवश्यक खबरदारी घेईन असं ट्विट कुलदीपने केलं. कुलदीप यादव सध्या दक्षिण अफ्रीकेविरोधात टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये व्यस्त आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळणा-या टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आज सेंच्युरियन येथे होणार आहे.  


Web Title: kuldeep yadav apologises unsolicited instagram post after account hacked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.