कुलदीपकडून आशा ठेवणे योग्यच- झहीर खान

कसोटी सामन्यातही लय कायम राखणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:49 AM2018-07-28T01:49:28+5:302018-07-28T01:49:50+5:30

whatsapp join usJoin us
Kuldeep is good to hope: Zaheer Khan | कुलदीपकडून आशा ठेवणे योग्यच- झहीर खान

कुलदीपकडून आशा ठेवणे योग्यच- झहीर खान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंग्लंडमधील सध्याची परिस्थिती पाहता भारतासाठी दोन विशेषज्ञ फिरकीपटूंना खेळवणे चांगले राहील. आणि १ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत युवा फिरकीपटू कुलदीप यादव याच्याकडून खूप आशा ठेवणे अयोग्य नाही, असे मत भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे.
ब्रिटनमध्ये सध्या वातावरणात उष्णता आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या संयोजनाबाबत खूपच चर्चा होत आहे. झहीर याने सीसीआयने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात हे वक्तव्य केले. तो म्हणाला की, ‘जर वातावरण उष्णता आहे, तर ते वेगवान गोलंदाजांसाठी कठीण आहे. त्यामुळे तुमच्याकडे नेहमीच दोन विशेषज्ञ फिरकी गोलंदाज खेळवण्याची संधी आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन दोन फिरकीपटूंना संधी देऊ शकते.’
डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव मर्यादित षटकांमधील आपल्या चांगल्या कामगिरीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
झहीर म्हणाला की, ‘आशा त्याच्याकडून ठेवल्या जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या खेळानंतर त्यात वाढ झाली आहे. जर तुम्ही चांगले खेळता तर असे होतेच आणि कुलदीपला त्याच्यापासून बाहेर यावे लागेल.’ २००७ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. त्या विजयात झहीर खान याने मोलाची भूमिका बजावली होती. तो म्हणाला की,‘कसोटी मालिकेचा विचार केला तर दक्षिण आफ्रिका दौरा पाहिला तर विराट कोहली योग्य दिशेने जात आहे.’
तो म्हणाला की, ‘प्रत्येक जण बोलत आहे की, ब्रिटनमधील हे वातावरण भारतासाठी फायदेशीर राहील. मीदेखील भारताचा दबदबा राहील अशी आशा करतो. पाच कसोटी सामन्यांची मालिका नेहमीच आव्हानात्मक असते. तुम्हाला कायम चांगल्या लयीत राहण्याची गरज असते. मात्र मला दक्षिण आफ्रिकेतील खेळानंतर चांगल्या प्रदर्शनाची आशा आहे.’
झहीर पुढे म्हणाला की, ‘ते कसोटी मालिका १-२ ने पराभूत झाले होते. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी अंतिम कसोटीत पुनरागमन केले होते. ते शानदार होते.’

कुलदीपकडून आशा ठेवल्या जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या खेळानंतर त्यात वाढ झाली आहे. जर तुम्ही चांगले खेळता तर असे होतेच आणि कुलदीपला त्याच्यापासून बाहेर यावे लागेल.
- झहीर खान

Web Title: Kuldeep is good to hope: Zaheer Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.