Kuldeep, Chalhal left the impression | कुलदीप, चहलने छाप सोडली
कुलदीप, चहलने छाप सोडली

सौरव गांगुली लिहितात...
भारताने शानदार कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मनोधैर्य ढासळू न देता वन-डे मालिकेत चमकदार कामगिरी केली.
विराटबाबत काय बोलायचे ? सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, रिकी पॉन्टिंग व ब्रायन लारा या दिग्गज खेळाडूंसोबत किंवा विरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो आणि विराटही यांच्या पंक्तीतील खेळाडू आहे. वातावरणासोबत जुळवून घेण्याची क्षमता आणि नियंत्रण हे तर सोडाच पण, प्रत्येक डावात फलंदाजीतील त्याची ऊर्जा व तीव्रता वाखाणण्याजोगी आहे.
वन-डे कारकिर्दीत झटपट ३४ शतक झळकाविणे, यासाठी विराटची प्रशंसा करण्यासाठी शब्दच नाहीत. या दौºयात विराटचा अपवाद वगळता अन्य एकाही भारतीय फलंदाजाला शतकी मजल मारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या केवळ एका फलंदाजाला शतक झळकावता आले. यावरून या दौºयात कोहलीने केलेल्या कामगिरीची कल्पना येते. हा दौºयात अद्याप पूर्ण संपलेला नाही, हे विशेष.
कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांची गोलंदाजीही उल्लेखनीय ठरली आहे. तीन सामन्यांत ३० पैकी २१ बळी घेणे सर्व काही सांगून जाते. केवळ या आकड्याला महत्त्व नाही, पण या फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीवर मानसिक आघात केल्याचे स्पष्ट होते. फिरकीला विशेष अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर ही कामगिरी झाली, ही बाब अधिक सुखावणारी आहे.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चेंडू कुठे वळणार आहे, हे बघत नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामचे बाद होणे हे आहे. डावाच्या उत्तरार्धात
एँडिले फेहलुकवायोच्या बॅटजवळून चेंडू गेल्यानंतर कुलदीपच्या चेहºयावरील हास्य सर्वकाही सांगून जात होते.
वन-डे मालिकेतील तीन सामने अद्याप शिल्लक असून एबी डिव्हिलियर्सचे संघात परतणे दक्षिण आफ्रिका संघासाठी आनंदाचे वृत्त आहे. केवळ डिव्हिलियर्सची उपस्थिती दक्षिण आफ्रिका संघासाठी लाभदायक ठरणार नाही. त्याला संघाचे नशीब पालटण्यासाठी कोहलीप्रमाणे कामगिरी करावी लागेल.
दक्षिण आफ्रिका संघात खेळाडूंची निवड हा एक मुद्दा आहे. मोर्ने मोर्केलला बुधवारच्या लढतीत वगळण्यात आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुढे खेळल्या जाणाºया तीन लढतींमध्ये त्याला संघात नक्कीच स्थान मिळण्याची शक्यता आहे. खाया झोंडो
आणि फेहलुकवायो यांना जर
दक्षिण आफ्रिका संघातील स्थान पक्के करायचे असेल तर
त्यांना स्वत:च्या कामगिरीचा
दर्जा उंचवावा लागेल. आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी कामगिरी तशी असावी लागते
आणि सद्यस्थितीत त्यांच्या कामगिरीबाबत असे म्हणता येणार नाही. (गेमप्लॅन)


Web Title: Kuldeep, Chalhal left the impression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.